SBI | Twitter

स्टेट बॅंक ऑफ इंडिया कडून Probationary Officers च्या नोकरभरतीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरूवात झाली आहे. दरम्यान उमेदवारांना sbi.co.in या ऑनलाईन वेबसाईट वर त्यासाठी अर्ज करता येणार आहे. सुमारे 600 प्रोबेशन ऑफिसर च्या भरतीसाठी ही प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये 586 रेग्युलर आणि 14 रिक्त जागांसाठी ही भरती सुरू झाली आहे. 12 जानेवारी 2025 पर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहे.

एसबीआय च्या प्रोबेशनरी ऑफ़िसर पदासाठी अर्ज करताना उमेदवाराचं वय किमान 21 वर्ष आवश्यक आहे तर कमाल 30 वर्ष आहे. यासाठी उमेदवार पदवीधर असणं आवश्यक आहे. मुलाखतीसाठी बोलावल्यास, त्यांनी 30 एप्रिल 2025 रोजी किंवा त्यापूर्वी पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे.

इंटिग्रेटेड ड्युअल डिग्री (IDD) प्रमाणपत्रे असलेल्या उमेदवारांनी IDD उत्तीर्ण होण्याची तारीख 30 एप्रिल 2025 किंवा त्यापूर्वीची असल्याची खात्री करावी. वैद्यकीय, अभियांत्रिकी, चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट यासारख्या व्यावसायिक पात्रता असलेले उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहे.

एसबीआय च्या प्रोबेशनरी ऑफ़िसर पदासाठी कसा कराल अर्ज?

  • sbi.co.in वर क्लिक करा आणि careers portal ओपन करा.
  • ‘Join SBI’ च्या खाली ‘Current Openings’चा पर्याय निवडा.
  • Probationary Officers recruitment page वर क्लिक करा त्यानंतर apply online चा पर्याय निवडा.
  • आता रजिस्ट्रेशन करण्यासाठी क्लिक करा. त्यानंतर रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लॉगिन डिटेल्स टाका.
  • अ‍ॅप्लिकेशन फॉर्म मध्ये सारे तपशील भरा.
  • तुमची आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि पेमेंट करा, एक्झाम फी भरा.
  • तुमचा अर्ज सबमीट केल्यानंतर त्याची एक कॉपी सेव्ह करू शकाल.

तर SC, ST आणि PwBD उमेदवारांना अ‍ॅप्लिकेशन फी माफ असणार आहे.