India's Most Powerful People: भारतातील 100 सर्वात शक्तिशाली लोकांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी अव्वल; गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री योगींचे स्थान कितव्या क्रमांकावर, जाणून घ्या
Narendra Modi, Amit Shah, Chief Minister Yogi (PC - Facebook)

India's Most Powerful People: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची लोकप्रियता सातत्याने वाढत असून देशातील 100 शक्तिशाली व्यक्तींच्या (Most Powerful People) यादीत ते पहिल्या क्रमांकावर आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याशिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मोहन भागवत, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि सपा प्रमुख अखिलेश यादव यांचाही या यादीत समावेश आहे.

इंडियन एक्स्प्रेसने प्रसिद्ध केलेल्या 100 शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी कायम आहेत. कोरोना महामारीमुळे उद्भवलेले संकट आणि त्यावरील लसीचे व्यवस्थापन, विधानसभा निवडणुकीत भाजपची मजबूत झालेली स्थिती यामुळे पंतप्रधान मोदींची प्रतिमा उंचावली आहे. याशिवाय, अलीकडेच, युद्धग्रस्त युक्रेनमधून 22000 हून अधिक तरुण भारतीयांना घरी आणण्यासाठी पंतप्रधान मोदी हे सर्वात वास्तविक नेते म्हणून उभे राहिले आहेत. (हेही वाचा -PAN-Aadhaar Linking Deadline: आधार-पॅन लिकिंगचा आज शेवटचा दिवस; इथे जाणून घ्या तुमची कार्ड्स जोडलेली आहेत की नाही?)

100 सर्वात शक्तिशाली लोकांच्या यादीत अमित शहा दुसऱ्या क्रमांकावर -

पॉवरफुल व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान मोदींनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्याचबरोबर या यादीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत तिसऱ्या क्रमांकावर असून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा चौथ्या क्रमांकावर आहेत. मुकेश अंबानी, $96 अब्ज (फोर्ब्सनुसार) संपत्ती असलेले सर्वात श्रीमंत भारतीय, सर्वात शक्तिशाली लोकांच्या यादीत 5 व्या स्थानावर आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 6 व्या स्थानावर -

उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवणारे योगी आदित्यनाथ 100 शक्तिशाली लोकांच्या यादीत सहाव्या स्थानावर आहेत. सीएम योगी यांच्यानंतर या यादीत सातव्या क्रमांकावर गौतम अदानी, आठव्या क्रमांकावर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, नवव्या क्रमांकावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दहाव्या क्रमांकावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन आहेत.

दरम्यान, 100 सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचेही नाव आहे. त्या या यादीत 11 व्या स्थानावर आहेत. दुसरीकडे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 13 व्या, उद्धव ठाकरे 16 व्या, शरद पवार 17 व्या, सोनिया गांधी 27व्या, राहुल गांधी 51व्या आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव 56 व्या स्थानावर आहेत.