PM Kisan Maan Dhan Scheme: वयाच्या साठी नंतर शेतकर्‍यांना प्रतिवर्षी 36,000 कमावण्याची संधी; पहा काय आहे योजना
Farmer | Phto Credits: PTI

Pradhan Mantri Kisan Mandhan Yojana: केंद्र सरकारने शेतकर्‍यांच्या हितासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे पीएम किसान मानधन योजना. यामध्ये वयाच्या साठीत आता शेतकर्‍यांनादेखील पेंशन मिळणार आहे. यामध्ये वय वर्ष 18 ते 40 मधील शेतकरी सहभागी होऊ शकतात. शेतकर्‍याच्या वयानुसार नियमित त्याला मासिक काही विशिष्ट रक्कमेचे योगदान करायचे आहे. वयाच्या 60 नंतर त्याला प्रति महा 3 हजार रूपये किंवा वर्षाला 36 हजार रूपये मिळू शकतात. दरम्यान प्रत्येक महिन्याला 55 रूपये ते 200 रूपये तुम्ही भरू शकता. आतापर्यंत या स्कीममध्ये 21 लाखाहून अधिक शेतकरी जोडले गेले आहेत.E-Crop Survey Mobile App: 'ई-पिक पाहणी मोबाईल ॲप' ठरणार शेतकऱ्यांसाठी उपयुक्त; जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्य.

किसान मानधन योजना अटी-नियम

दरम्यान या किसान मानधन योजनेमध्ये सहभागी होणार्‍या व्यक्तीकडे 2 हेक्टर पर्यंत शेतजमीन असणं आवश्यक आहे. या योजनेमध्ये किमान 20 वर्ष आणि कमाल 40 वर्षांपर्यंत 55 रूपये ते 200 रूपये पर्यंत मासिक रक्कम भरावी लागणार आहे. ही रक्कम शेतकर्‍याच्या वयोमानावर अवलंबून आहे. शेतकरी 18 वर्षाचा असेल तर मासिक 55 रूपये किंवा वर्षाला 660 रूपये भरू श्कातो. तर 40 वर्षाचा शेतकरी प्रतिमहा 200 किंवा वर्षाला 2400 रूपये देऊ शकतो.

पीएम किसान मानधन योजनेमध्ये शेतकरी जितक्या रक्कमेचं योगदान देणार तितकेच सरकार देखील देणार आहे. जर एखादा शेतकरी स्कीम मध्येच सोडू इच्छित असेल तर त्याची रक्कम बुडणार नाही. तो स्कीम सोडेपर्यंत जी रक्कम जमा असेल त्यावर सेविंग अकाऊंट च्या बरोबरीने व्याज मिळणार आहे. जर शेतकर्‍याचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला 50% रक्कम मिळणार .

दरम्यान पेंशन योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍याला कॉमन सर्विस सेंटर मध्ये जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. रजिस्ट्रेशन साठी आधार कार्ड आवश्यक असेल. सोबत फोटो, पासबूक देखील आवश्यक आहे. रजिस्ट्रेशन निशुल्क असेल. यावेळेस किसान पेंशन युनिक नंबर आणि पेंशन कार्ड देखील बनवलं जाईल.