मागील वर्षी मार्च महिन्यात महाराष्ट्रात पहिल्या कोविड रूग्णाचे निदान झाले. त्यानंतर बघता बघता या विषाणूने आपले हात पाय पसरायला सुरूवात केली. आता या कोविड 19 संकटावर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे पण मागील वर्षभरात अनेकांनी आपली जीवाभावाची मंडळी कोविड 19 मुळे गमावली आहेत. आता या कोरोनारूग्णांचं डिजिटल स्मारक जपत त्यांच्याप्रती आदरांजली अर्पण करण्यासाठी खास पोर्टल बनवण्यात आलं आहे. nationalcovidmemorial.in यावर कोविड 19 मुळे आपल्यातील गमावलेल्या त्या खास व्यक्तीला श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.
दरम्यान ही संकल्पना कोलकत्ता बेस्ड एका एनजीओची आहे. तर हे वेब पोर्टल COVID Care Network (CCN) कडून बनवण्यात आलं आहे. याच्या माध्यमातून कुटुंबीय, मित्रमंडळींना ऑनलाईन श्रद्धांजली अर्पण करता येणार आहे. यामध्ये कोणत्याही भाषा, प्रांताचं बंधन नाही. तुमची जवळची एखादी व्यक्ती तुम्ही कोविड 19 मुळे गमावली असेल तर त्याचा शोकसंदेश तुम्ही ऑनलाईन अपडेट करू शकता. Covid-19 च्या निदानासाठी आता भारतीय लष्करातील श्वानपथक देखील होतयं सज्ज, प्रशिक्षण सुरू; जाणून घ्या डॉग स्क्वॉड कसे ओळणार कोरोनाबाधित रूग्ण!
नॅशनल कोविड मेमोरिअल वर कसं कराल अपडेट?
nationalcovidmemorial.in ला भेट द्या. त्यानंतर SUBMIT MEMORIAL वर क्लिक करून विचारलेली माहिती अपडेट करा. यामध्ये तुम्हांला कोविड 19 मुळे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचा फोटो आणि डेथ सर्टिफिकेट देखील अपडेट करायचं आहे. त्यानंतर माहिती क्रॉस चेक करण्यासाठी फोन देखील येईल.
नॅशनल कोविड मेमोरिअलच्या अॅड्व्हायरी पॅनलवर अनेक प्रख्यात डॉक्टर, विविध क्षेत्रातील नामवंत मंडळी आहेत. महाराष्ट्र राज्याचे कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ संजय ओक यांचा देखील त्यामध्ये समावेश आहे. यामध्ये तुमच्या जवळच्या व्यक्तीची माहिती अपडेट करायची असेल तर ती निशुल्क आहे.
भारतामध्ये मार्चपासून कोविड 19 मुळे मृतांचा आकडा 1,56,000 पेक्षा अधिक आहे. आता कोरोना परिसथिती नियंत्रणामध्ये आहे. महिन्याभरापूर्वी कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी देशातील कोविड 19 लसीकरणाला सुरूवात केली आहे.