Lok Sabha Elections 2024 Phase 1 Voting: महाराष्ट्रात 19 एप्रिल ला 5 जागांवर मतदान; पहा कसा, कधी, कुठे बजावाल तुमचा मतदानाचा हक्क!
Voter ID Representational Image (Photo Credits: IANS)

लोकसभा निवडणूकींसाठी (Lok Sabha Elections) आता मतदानाची (Voting) जवळ येऊन ठेपली आहे. देशात पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिल दिवशी मतदान होणार आहे. देशात 102 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार असून यामध्ये महाराष्ट्रातील 5 लोकसभा मतदार संघांचा समावेश आहे. राज्यात 19 एप्रिलला विदर्भातील रामटेक, भंडारा-गोंदिया, नागपुर, गढचिरोली-चिमूर आणि चंद्रपुर मध्ये मतदान होणार आहे. या भागातील मतदार उद्या मतदानाचा आपला हक्क बजावणार आहेत. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार, प्रतिभा धानोरकर या महत्त्वाच्या उमेदवारांचे राजकीय भविष्य मतपेटीत कैद होणार आहे. या निवडणूकीचा निकाल 4 जून दिवशी लागणार आहे.

लोकसभा मतदानाचा कसा, कधी, कुठे बजावाल हक्क ?

  • मतदारांना रहिवासी पत्त्यानुसार मतदान केंद्रं दिली गेली आहेत. electoralsearch.eci.gov.in किंवा Voter Helpline App वर तुमचा मतदान कार्ड (EPIC) क्रमांक आणि राज्य टाकून मतदान केंद्राची माहिती मिळणार आहे. How to Know Polling Booth Online: लोकसभा निवडणूकीच्या मतदानासाठी तुमचं मतदान केंद्र कुठं? बुथ क्रमांक कोणता ? electoralsearch.eci.gov.in वर असं पहा एका क्लिक वर! 
  • मतदान करताना मतदाराकडे ग्राह्य ओळखपत्र आवशयक आहे. वोटर कार्ड नसल्यास अन्य 12 ग्राह्य ओळखपत्रांपैकी कोणत्याही ओळखपत्राच्या आधारे तुम्ही मतदानाचा हक्क बजावू शकणार आहात. Lok Sabha Elections 2024: मतदार कार्ड नाही? मग पहा कोणत्या ओळखपत्रांच्या मदतीने करू शकाल मतदान ! 
  • दिव्यांग नागरिक मतदान केंद्रावर येऊन मताधिकार बजावू इच्छितात, त्यांच्यासाठी भारत निवडणूक आयोग स्वयंसेवक व व्हीलचेअरची व्यवस्था करणार आहे. या सुविधा मिळण्यासाठी दिव्यांग मतदारांनी आपले नाव Saksham-ECI या ॲपवर चिन्हांकित करणे आवश्यक आहे.
  • मतदानाची सामान्य वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे पण गडचिरोली-चिमुर (अज) या लोकसभा मतदार संघातील आमगांव, आरमोरी, गडचिरोली, अहेरी या 4 तसेच भंडारा-गोंदिया या लोकसभा मतदार संघातील अर्जुनी मोरगांव विधानसभा मतदारसंघात मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत राहणार आहे.

19 एप्रिलला मतदानाच्या पहिल्या टप्प्यात 97 उमेदवार निवडणूक लढणार असून 10,652 मतदान केंद्र सज्ज आहेत. 95,54,667 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.