
Kotak Mahindra Bank कडून आता एटीएम कार्ड चार्जेस (ATM Transaction Charges) वाढवण्यात आले आहेत. कोटकच्या स्वतःच्या एटीएम मधून किंवा अन्य एटीएम मधूनाही पैसे काढणं 1 मे 2025 पासून महाग झाले आहे. दर महिन्याला मोफत ट्रांझॅक्शन ची मर्यादा संपल्यानंतर जर तुम्हांला एटीएम मधून पैसे काढायचे असतील तर हे पैसे द्यावे लागणार आहेत. नक्की वाचा: ATM Withdrawals New Charges: 1 मे पासून एटीएम मधून पैसे काढणं महागणार; पहा ट्रान्झॅक्शनचे नवे दर .
कोटक चे दर महिन्याला ATM Transaction Charges काय?
रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया कडून जारी नव्या नियमावलीनुसार, ATM transaction charges मध्ये आता बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार कोटक बॅंकेने आता एटीएम बँकिंग सेवांसाठी ग्राहकांना प्रति व्यवहार 23 रुपये आकारले जातील असे जाहीर केले आहे. जे पूर्वी आरबीआयने प्रति व्यवहार 21 रुपये आकारले होते. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की जर बँकेच्या ग्राहकाने एका महिन्यात त्यांची मोफत एटीएम व्यवहार मर्यादा संपवली तर वाढलेले एटीएम शुल्क लागू होईल.
ATM Charges कधी लागतात?
बँकेच्या ईमेलनुसार, ग्राहकांना दरमहा निश्चित संख्येने मोफत एटीएम व्यवहार मिळत राहतील (उदाहरणार्थ, इतर बँकांच्या एटीएममधून 5 वेळा मोफत पैसे काढता येतील). हे फायदे बदलणार नाहीत. तुम्ही तुमच्या खात्याच्या मोफत व्यवहार मर्यादेपेक्षा जास्त गेलात तरच नवीन शुल्क लागू होतील.
Kotak Mahindra Bank चे प्रतिदिन पैसे काढण्याची मर्यादा किती?
Kotak Mahindra Bank च्या एटीएममधून प्रतिदिन पैसे काढण्याची मर्यादा तुमच्या खात्याच्या प्रकारावर अवलंबून असते. Kotak Edge, Pro,आणि Ace खातेधारकांसाठी ही मर्यादा 1 लाख रुपये आहे. Easy Pay खातेधारकांसाठी ही मर्यादा 25,000 रुपये आहे.
एटीएम मधून प्रतिदिन किती रूपये काढता येतात?
जर तुमच्याकडे कोटक एज, कोटक प्रो किंवा कोटक एस सारखे काही विशिष्ट प्रकारचे डेबिट कार्ड असतील तर ग्राहक एटीएममधून एका दिवसात 50,000 रुपये काढू शकतात. ही मर्यादा फक्त भारतात केलेल्या व्यवहारांवर लागू होते.
बॅलन्स चौकशी किंवा मिनी स्टेटमेंट सारख्या गैर-आर्थिक व्यवहारांसाठी शुल्क 8.5 रुपयांवरून 10 रुपये प्रति व्यवहारापर्यंत वाढणार आहेत. बँकेने नवीन शुल्कांबद्दल एक चार्ट जारी केला आहे.