other Uses of Condoms | (Photo credit: archived, edited, representative image)

Learn Non-Sex Uses of Condoms: कंडोम आणि सेक्स (Condoms and sex) हे एक अतूट नातं. सुरक्षित लैंगिक संबंध (Safe Sex) आणि नको असलेली गर्भधारणा टाळण्याचा एक उत्तम पर्याय म्हणजे कंडोमचा वापर. त्यामुळे आपल्यापैकी अनेकांचा असा समज आहे की, कंडोम (Condom) केवळ सेक्स (Sex) करतानाच वापरावा. त्याचा वापर केवळ सेक्स करण्यापूरताच करता येतो. बऱ्याच अंशी याला कंडोम कंपन्यांकडून केली जाणारी जाहीरातही कारणीभूत आहे. अर्थात, कंडोंम निर्मात्या कंपन्यांचा ग्राहकवर्ग प्रामुख्याने पक्का ठरलेला असतो. त्यामुळे त्या कंपन्या त्या ग्राहकवर्गाला आकर्षित करण्यासाठी तशा प्रकारच्या जाहीराती तायर करतात. म्हणूनच आज आंतरराष्ट्रीय कंडोम दिनानिमित्त आपल्याला सांगत आहोत कंडोमचे खास उपयोग. जो आहे सेक्सपेक्षाही अगदीच हटके.

पाणी साठविण्यासाठी

कंडोम हा वापरण्यासाठी अगदीच सोपा आणि लवचीक असल्यामुळे त्याचा वापर करणे सहज शक्य आहे. अतिशय चिवट, कॉम्पॅक्ट आणि ओढण्यासाठी सोपा तसेच वॉटरटाइट हे आहेत कंडोमचे खास गुण. महत्त्वाचे म्हणजे कंडोम अजिबात लिक नसतो. त्यामुळे पाणी साठवून ठेवण्यासाठी तुम्ही कंडोमचा वापर करु शकता. अर्थात, हे पाणी वापरासाठी म्हणून तुम्ही साठवू शकता. कारण, कंडोम हा वंगणयुक्त असतो. त्यामुळे त्याच साठवलेले पाणी आरोग्यास हितकारक असेलच असे नाही. एका कंडोममध्ये तुम्ही साधारण एक ते दोन लिटर पाणी साठवू शकता.

टॉयलेटमध्ये पडलेले सामान बाहेर काढण्यासाठी

नजरचुकीने किंवा कोणत्याही कारणामुळे तुमचे महत्त्वाचे सामना (मोबाईल, पेन, घड्याळ, पैसे, दागिणा) टॉयलेटच्या भांड्यात पडला. तर, तो बाहेर काढण्यासाठी तुम्ही कंडोमचा वापर करु शकात. त्यासाठी तुम्ही हातात कंडोम घालून तो हात टॉयलेटच्या भांड्यात घालू शकता. असे केल्याने तुमची वस्तू तुम्हाला परत भेटेल आणि तुमचा हातही भरणार नाही. हे वाचायला आणि कल्पना करायलाही काहीसे विचित्र वाटते आहे खरे. पण, टॉयलेटमध्ये पडलेले सामान बाहेर काढण्यासाठी सोपा आणि कमी खर्चीक उपाय तर हाच दिसतो आहे.

पावसाळ्यात मौल्यवान वस्तूंना पाण्यापासून वाचविण्यासाठी

मोबाईल, घड्याळ, कॅल्क्युलेटर, पाकीट, छोटी डायरी, कनाचे मशीन, औषधं, पैसे अशा एक ना अनेक गोष्टींचे पावसाळ्यात पाण्यापासून संरक्षण करणे म्हणजे एक जबाबदारीच. पण काळजी करु नका. कंडोम आहे ना. कंडोम तुमची मदत करेन. या वस्तू तुम्ही कंडोममध्ये भरा. कितीही मोठा पाऊस आला तरी तो तुमच्या वस्तुंना भिजवू शकणार नाही. तुम्ही जर वेगळा विचार करत असाल, जसे की प्लॅस्टिक पिशवी वैगेरे वापरायचा तर, इतर प्लॅस्टिक वस्तू पाण्यापासून तुमच्या किमती वस्तूंना कंडोमइतक्या सुरक्षितपणे वाचवू शकत नाहीत हे नक्की. (हेही वाचा, पुणे: कंडोम वापरता? आता पिशवीही वापरा! विद्यार्थ्यांच्या लढ्याला मोठे यश)

पावसाळ्यात पायमोजे म्हणून वापरायचा

अनेकदा असे होते की, तुम्हाला बाहेर जायचे असते. पण, बाहेर पाऊस पडत असतो आणि पाण्यात पाय भिजू नयेत म्हणून तुम्ही घाबरत असता. अशा वेळी कंडोम तुमचा मित्र बनू शकतो. कंडोममध्ये पाय घाला. त्यानंतर त्यावर पायमोजे घाला. आता हे पाय बुटात घाला आणि भर पावसात बाहेर पडा. तुमच्या पायांना पाण्याचा एक थेंबही स्पर्श करणा नाही. खोटे वाटत असेल तर प्रयोग करुन पाहायला हरकत नाही.