Indian Railways: कोरोना काळात रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! 'या' विशेष गाड्या लवकरचं सुरू होणार; पहा संपूर्ण यादी
Railway | Image used for representational purpose | (फोटो सौजन्य-फेसबुक)

Indian Railways: कोरोना व्हायरसच्या नव्या लाटे दरम्यान भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेगाड्यांची संख्या सातत्याने वाढवत आहे. त्याअंतर्गत पश्चिम रेल्वे अतिरिक्त साप्ताहिक विशेष गाड्या चालवणार आहे. या तीन गाड्या वांद्रे टर्मिनस-बरौनी जंक्शन, सूरत-हटिया आणि उधना-छपरा स्थानकांदरम्यान धावतील. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकानुसार प्रवाशांच्या सुविधा आणि प्रवासाची मागणी पूर्ण करण्यासाठी पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनस-बरौनी जंक्शन, वांद्रे टर्मिनस-सुभेदारगंज, सूरत-हटिया आणि उधना-छपरा विशेष रेल्वगाड्या सुरू केल्या आहेत. स्थानकांदरम्यान आणखी तीन साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (वाचा - पश्चिम रेल्वेकडून उत्तर भारतातील स्थलांतरित मजूरांसाठी 14 स्पेशल ट्रेनची घोषणा)

09005/09006 वांद्रे टर्मिनस - बरौनी साप्ताहिक विशेष

ट्रेन क्रमांक 09005

वांद्रे टर्मिनस-बरौनी साप्ताहिक स्पेशल वांद्रे टर्मिनसहून दर शुक्रवारी 15.45 वाजता सुटेल व रविवारी संध्याकाळी 13.20 वाजता बरौनीला पोहोचेल. ही ट्रेन 16 एप्रिल ते 28 मे 2021 दरम्यान धावेल.

ट्रेन क्रमांक 09006

बरौणी - बांदा टर्मिनस साप्ताहिक स्पेशल दर सोमवारी बरौनी जंक्शन येथून 00.30 वाजता सुटेल व मंगळवारी वांद्रे टर्मिनस येथे 17.25 वाजता पोहोचेल. ही ट्रेन 19 एप्रिल 2021 ते 31 मे 2021 पर्यंत धावेल.

ही ट्रेन कुठे-कुठे थांबेल -

या गाड्या बोरीवली, वापी, सूरत, वडोदरा, रतलाम, नागदा, कोटा, सवाई माधोपूर, बयाना, आग्रा किल्ला, तुंडला, कानपूर मध्य, लखनऊ शहर, फैजाबाद, वाराणसी, दीन दयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि पाटणा स्थानकांवर थांबतील. या गाड्यांमध्ये एसी 2-टायर कम 3-टायर, स्लीपर क्लास आणि द्वितीय श्रेणी बसण्याचे डबे आहेत.

09095/09096 वांद्रे टर्मिनस-सुभेदारगंज एसी सुपरफास्ट स्पेशल

ट्रेन क्रमांक 09095

वांद्रे टर्मिनस-सुभेदारगंज वांद्रे टर्मिनस येथून दर सोमवारी 21.45 वाजता सुटेल व सुभेदारगंज येथे बुधवारी 3.00 वाजता पोहोचेल. ही ट्रेन 12 एप्रिल ते 31 मे 2021 पर्यंत धावेल.

ट्रेन क्रमांक 09096

सुभेदारगंज-बांदा टर्मिनस दर बुधवारी 5.30 वाजता सुभेदारगंज येथून सुटेल आणि वांद्रे टर्मिनसवर गुरुवारी सकाळी 11.20 वाजता पोहोचेल. ही ट्रेन 14 एप्रिल 2021 ते 2 जून 2021 पर्यंत धावेल.

ही ट्रेन या ठिकाणी थांबेल -

या गाड्या बोरीवली, वापी, सूरत, वडोदरा, रतलाम, कोटा, सवाई माधोपूर, गंगापूर शहर, बयाना, आग्रा किल्ला, इटावा आणि कानपूर मध्य स्थानकांवर थांबत आहेत. ट्रेनमध्ये एसी 3-टियर आणि एसी चेअर कारचे डबे आहेत.

09081/09082 सूरत-हटिया सुपरफास्ट स्पेशल ट्रेन स्पेशल

ट्रेन क्रमांक 09081

सूरत-हटिया साप्ताहिक स्पेशल दर गुरुवारी सूरतहून 14.20 वाजता सुटेल व शुक्रवारी 17.30 वाजता हतियाला पोहोचेल. ही ट्रेन 15 एप्रिल ते 27 मे 2021 दरम्यान धावेल.

ट्रेन क्रमांक 09082

हटिया - सूरत साप्ताहिक स्पेशल हतिया येथून प्रत्येक शनिवारी 00.20 वाजता सुटेल आणि रविवारी 04.00 वाजता सूरतला पोहोचेल. ही ट्रेन 17 एप्रिल 2021 ते 29 मे 2021 दरम्यान धावेल.

ही ट्रेन कुठे-कुठे थांबेल -

ही गाडी नंदुरबार, भुसावळ, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा आणि राउरकेला स्थानकांवर थांबेल. ट्रेनमध्ये एसी 2-टियर कम 3-टियर, स्लीपर क्लास आणि सेकंड क्लास सीटिंग कोच आहेत.

ट्रेन क्रमांक 09087/09088 उधना-छपरा सुपरफास्ट विशेष

ट्रेन क्रमांक 09087

उधना-छपरा विशेष ट्रेन दर शुक्रवारी उधना येथून 08.35 वाजता सुटेल व शनिवारी 13.20 वाजता छपरा येथे पोहोचेल. ही ट्रेन 16 एप्रिल ते 30 एप्रिल 2021 दरम्यान धावेल.

ट्रेन क्रमांक 09088

छपरा-उधना विशेष ट्रेन दर रविवारी छापरा येथून 00.15 वाजता सुटेल आणि सोमवारी सकाळी 07.00 वाजता उधनाला पोहोचेल. ही ट्रेन 18 एप्रिल ते 2 मे 2021 पर्यंत धावेल.

ही ट्रेन या ठिकाणांवर थांबेल -

ही गाडी नंदुरबार, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज चोकी, मिर्जापूर, वाराणसी, जौनपूर आणि बलिया स्थानकांवर थांबेल. ट्रेनमध्ये एसी टू-टियर, स्लीपर क्लास आणि द्वितीय श्रेणी बसण्याचे डबे आहेत.

या तारखेपासू सुरू होईल बुकिंग -

ट्रेन नंबर 09095 चे बुकिंग 10 एप्रिल 2021 पासून सुरू होईल. ट्रेन नंबर 09005 आणि 09081 ची बुकिंग 12 एप्रिल, 2021 पासून सुरू होईल. ट्रेन नंबर 09087 ची बुकिंग 14 एप्रिल, 2021 पासून आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर नियुक्त केलेल्या पीआरएस काउंटरवर सुरू होईल.