महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर केल्याने स्थलांतरित मजूरांनी आपल्या घरचा मार्ग पकडला आहे. याच पार्श्वभुमीवर शुक्रवारी पश्चिम रेल्वेकडून स्थलांतरित मजूरांसाठी 14 स्पेशल ट्रेनची घोषणा करण्यात आली आहे. याआधी मध्य रेल्वेकडून उत्तर भारतासाठी 3 विशेष गाड्या धावणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. गेल्या एका आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात स्थलांतरित मजूर आपल्या घरी परतत आहेत. त्यामुळेच रेल्वेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.(Mumbai: स्थलांतरित कामगारांची संख्या वाढल्याने मध्य रेल्वेकडून 3 स्पेशल ट्रेन चालवल्या जाणार)
स्थलांतरित मजूरांची रेल्वेस्थानकात वाढती संख्या पाहता विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काही दिवसात आणखी गाड्या सोडल्या जाणार असल्याचे ही पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर आलोक कंसल यांनी म्हटले आहे. सध्याचे निर्बंध पाहता फक्त आरक्षित तिकिट असलेल्यांनाच प्रवास करण्यास परवानगी दिली जात आहे. तरीही सुद्धा मजूर रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात येत आहेत.
तर गुरुवारी 900 मजुर वांद्रे टर्मिनसवर दाखल झाले होते. त्यापैकी 300 जणांकडे तिकिटेच नसल्याने त्यांना रेल्वे स्थानकातून बाहेर जाण्यास सांगितले गेले. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, आरक्षित तिकिट नसेल तर रेल्वे स्थानकात कोणालाही उभे केले जाणार नाही आहे. दुसऱ्या बाजूला मध्य रेल्वेकडून प्लॅटफॉर्म तिकिट दिली जात होती ती सुद्धा गुरुवारी बंद करण्यात आली आहे.(Delhi Night Curfew: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत 30 एप्रिलपर्यंत रात्री 10 ते पहाटे 5 या वेळेत नाईट कर्फ्यू लागू)
आरक्षित तिकिट असलेल्या नागरिकांनी संचारबंदी संदर्भात भीती बाळगू नये असे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. त्याचसोबत या बद्दल राज्यातील सरकारला सुद्धा त्यांना प्रवासासाठी परवानगी देण्यासंदर्भात विचारले आहे. पश्चिम रेल्वेकडून 140 आयसोलेशन कोच किंवा कोविड केअर सेंटरची सुविधा नागरिकांना उपलब्ध करुन दिली आहे.