
EPFO कडून त्यांच्या 7.5 कोटीपेक्षा अधिक सदस्यांना आनंदाची बातमी दिली आहे. आता नव्या नियमानुसार, EPFO सदस्य auto-claim settlement मधून 5 लाखापर्यंतची रक्कम काढू शकतात. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी दिलेल्या माहितीनुसार पैसे काढण्याची मर्यादा 1 लाखावरून 5 लाखापर्यंत करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये पीएफ सदस्यांना तातडीने पैसे मिळावेत या उद्देशाने ही मर्यादा वाढवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
EPFO सदस्यांसाठी केलेल्या नव्या उपाययोजनांमध्ये क्लेम अधिक सुलभ आनी वेगवान केला जात आहे. 2020 मध्ये कोविड-19 साथीच्या काळात सुरुवातीला सुरू करण्यात आलेली, ऑटो-क्लेम सुविधा पूर्वी आजारपणासाठी पैसे काढण्यासाठी मर्यादित होती. आता ती शिक्षण, लग्न आणि घर बांधणं यासारख्या महत्त्वाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
Auto-Settlement Limit मध्ये वाढ
Another People-Centric Move under Modi Government!
EPFO enhances Auto-Settlement Limit for Advance Claims from ₹1 Lakh to ₹5 Lakh, with fast-track disbursal now within 72 hours. pic.twitter.com/MbBQGhWH5p
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) June 24, 2025
कसा काढाल पीएफ
आता पीएफ ऑफिसच्या दाव्यानुसार, 95% दावे आता फक्त तीन दिवसांत निकाली काढले जातात, जे पूर्वी 10 दिवसांचा वेळ घेत होता. आता दावे रद्द होण्याचं प्रमाणही सुधारले आहे.
सदस्य आता UAN पोर्टलवर लॉग इन करू शकतात, त्यांचे KYC तपशील पडताळू शकतात आणि कमीत कमी प्रयत्नात ऑनलाइन दावे दाखल करू शकतात. एकदा UAN आधारशी लिंक झाले की, बँक तपशील अपडेट करण्यासाठी employer approval ची आवश्यकता नाही.