Phooto credits PTI

रेल्वेचं तिकिट काढण्यासाठी लांबच लांब रांगेत उभे राहणं हे कंटाळवाणे कामा आहे. या वेळखाऊ गोष्टीपासून सुटका मिळवण्यासाठी आता रेल्वेने नवनवे पर्याय उपलब्ध केले आहे. नोटाबंदीनंतर डिजिटल पेमेंटचं प्रमाण झ्पाट्याने वाढलं आहे. अनेक मुंबईकर लोकलने फिरताना दररोजचं तिकीट किं वा सीझन तिकिटंही अवघ्या एका क्लिकवर UTS अ‍ॅपवर काढतात. आता मध्य रेल्वेने स्थानकांचा टप्पा वाढवला आहे.

UTS अ‍ॅपवर नवे अपडेट्स

केवळ मुंबईतील लोकल स्थानकांची तिकीट UTSवर उपलब्ध होती. मात्र आता या अ‍ॅपमध्ये नवे अपडेट करण्यात आले आहेत. यानुसार मध्य रेल्वेवर पुणे, सोलापूर, भुसावळ, नागपूर, मुंबई येथील लांब पल्ल्याच्या स्थानकांची तिकीटंही मोबाईल अ‍ॅप्सवर काढता येणार आहेत. आज 12 ऑक्टोबर पासून UTS अ‍ॅपवर ही सोय खुली करून देण्यात आली आहे.

आर वॉलेटवर 5% सूट

रेल्वेच्या आर वॉलेटमध्ये प्रवासी काही रक्कम ठेवू शकतात. तिकीट बुकिंगसाठी ही रक्कम वापरली जाऊ शकते. आता आर वॉलेटच्या प्रत्येक रिचार्जनंतर प्रवासांना 5% कॅशबॅकदेखील मिळणार आहे.

पेपरलेस तिकीट आणि जीपीएस यंत्रणेचा वापर करून तिकीट बुकिंगची सोय असल्याने प्रवाशांमध्ये या अ‍ॅपच्या मदतीने तिकीट बुकिंग करणे फायदेशीर आणि वेळेची बचत करणारी ठरणार आहे.