Bank Strike: जर तुम्हाला या आठवड्यात बँकेशी संबंधित कोणतेही काम करायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. या आठवड्यात बँकिंग सेवेबरोबरच एटीएम सेवाही विस्कळीत होणार आहे. वास्तविक, या आठवड्यात बँक कर्मचारी संपावर जात (Bank Employees On Strike) असल्याने बँकेच्या कामकाजावर परिणाम होणार आहे. 19 नोव्हेंबर 2022 रोजी बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेने (All India Bank Employee Association) एक दिवसीय संप पुकारला आहे.
बँक ऑफ बडोदाने (Bank Of Baroda) स्टॉक एक्स्चेंज (Stock Exhanges) कडे आपल्या नियामक फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) च्या सरचिटणीस यांनी इंडियन बँक असोसिएशनला संपावर जाण्यास सांगितले आहे. यात युनियनने आपल्या मागण्यांसाठी 19 नोव्हेंबर 2022 रोजी संपावर जाण्याचे म्हटले आहे. म्हणजेच 19 नोव्हेंबरला बँकांचे काम ठप्प होणार आहे. (हेही वाचा - 7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! जानेवारी 2023 मध्ये 'इतका' वाढणार DA; पगारात किती वाढ होणार? जाणून घ्या)
संपाच्या दिवशी बँक शाखा आणि कार्यालयांमध्ये कामकाज सुरू ठेवण्यासाठी सर्व योग्य ती पावले उचलली जात आहेत, पण बँक कर्मचारी संपावर गेल्यास बँकेच्या शाखा आणि कार्यालयांच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो, असेही बँकेने म्हटले आहे. वास्तविक, 19 नोव्हेंबर 2022 हा शनिवार आहे आणि प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँक बंद असते. मात्र या महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी संपामुळे बँकिंग सेवेवर परिणाम होणार आहे.
तथापी, शनिवारी संपामुळे कामकाज बंद राहणार असून, दुसऱ्या दिवशी रविवारी सुट्टी असेल. अशात जर तुम्हाला बँकेशी संबंधित कोणतेही काम करायचे असेल तर तुम्ही ते या आठवड्यातचं करू शकता. दुसऱ्याच दिवशी रविवार असल्याने सर्वसामान्यांना दोन दिवस एटीएममध्ये पैशांच्या तुटवड्याचा सामना करावा लागू शकतो.