PNB, SBI, BOB (PC - Twitter)

Bank Rules Change From 1 February 2022: 1 फेब्रुवारीपासून एसबीआय (SBI), पीएनबी (PNB) आणि बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda-BoB) मध्ये खाती असणाऱ्या ग्राहकांसाठी काही नियम बदणार आहेत. BOB त्‍यांच्‍या धनादेश आणि SBI-PNB च्‍या ग्राहकांच्‍या पैशाच्‍या व्‍यवहाराशी संबंधित नियमात बदल करणार आहे. बँकेचे नियम बदलल्यानंतर कोणाकडून किती शुल्क आकारले जाईल ते जाणून घेऊयात.

1 फेब्रुवारीपासून SBI आकारणार अधिक शुल्क -

आपल्या सर्व ग्राहकांना माहिती देताना SBI ने सांगितले आहे की, 1 फेब्रुवारीपासून पैसे ट्रान्सफर करणे महाग होणार आहे. वेबसाइटवर जारी केलेल्या तपशीलांनुसार, बँकेने IMPS व्यवहारांमध्ये एक नवीन स्लॅब जोडला आहे, ज्याची श्रेणी 2 लाख ते 5 लाख रुपये आहे. म्हणजेच, आता तुम्हाला पुढील महिन्यापासून 2 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंत बँक शाखेतून IMPS द्वारे पैसे पाठवण्यासाठी 20 रुपये शुल्क आणि GST भरावा लागेल.

BoB चेक क्लिअरन्सच्या नियमात करणार बदल -

जर तुम्ही बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी 1 फेब्रुवारीपासून चेक क्लिअरन्स नियमाशी संबंधित नियमांमध्ये बदल होणार आहेत. 1 फेब्रुवारीपासून चेक पेमेंटसाठी कन्फर्मेशन अनिवार्य असेल. बँकेने ही माहिती दिली आहे. बँकेचे म्हणणे आहे की, 'आम्ही सुचवितो की तुम्ही CTS क्लिअरिंगसाठी Positive pay system च्या सेवेचा लाभ घ्या.

डेबिट अयशस्वी झाल्यास PNB आकारेल 250 रुपये -

पीएनबीनेही आपल्या ग्राहकांसाठी काही नियम बदलले आहेत. जर 1 फेब्रुवारीपासून तुमचे कोणतेही हप्ते किंवा गुंतवणूक डेबिट खाते पैशाअभावी फेल झाले तर त्यासाठी 250 रुपये भरावे लागतील. सध्या बँक तुमच्याकडून यासाठी फक्त 100 रुपये आकारते. याशिवाय, डिमांड ड्राफ्ट रद्द केल्यानंतरही, बँक तुमच्याकडून 150 रुपये आकारेल, ज्यासाठी तुम्ही सध्या 100 रुपये भरता.