PM Kisan Samman Nidhi Installment: शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) चा 18 वा हप्ता जारी करण्यात आला आहे. देशभरातील 2.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकारने 2000 रुपयांचा हप्ता जारी केला आहे. केंद्र सरकारने 18 व्या हप्त्यासाठी 20,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च केली आहे. जर काही कारणाने तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत तर काळजी करण्याची गरज नाही. तुमच्या घराजवळील कोणत्याही एटीएममध्ये जाऊन तुम्ही तुमचे मिनी स्टेटमेंट तपासू शकता. याशिवाय, तुम्ही हेल्पलाइन नंबर 0120-6025109, 011-24300606 वर कॉल करू शकता.
महाराष्ट्रातील वाशिम येथील बंजारा हेरिटेज संग्रहालयाच्या उद्घाटनानंतर पीएम मोदींनी (Prime Minister Narendra Modi) पीएम किसानचा 18 वा हप्ता जारी केला. यावेळी व्यासपीठावर कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, नवरात्रीच्या या शुभ मुहूर्तावर मला पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 18वा हप्ता जारी करण्याची संधी मिळाली. महाराष्ट्राचे डबल इंजिन सरकार येथील शेतकऱ्यांना दुहेरी लाभ देत आहे. पोहरादेवीच्या आशीर्वादाने मला नुकतीच लाडकी बेहन योजनेच्या लाभार्थ्यांना मदत करण्याची संधी मिळाली आहे. ही योजना स्त्री शक्तीचा सन्मान वाढवत आहे. (हेही वाचा - PM Modi आज महाराष्ट्र दौर्यावर; Jagdamba Mata Temple, Poharadevi चं दर्शन घेत केली पूजा (Watch Video))
माननीय प्रधानमंत्री श्री @narendramodi ने आज वाशिम, महाराष्ट्र में आयोजित किसान सम्मान सम्मेलन के दौरान पीएम किसान योजना की 18वीं किस्त के अंतर्गत 9.4 करोड़ से अधिक किसानों को ₹20 हजार करोड़ से अधिक की धनराशि का हस्तांतरण किया। #PMKisanSamman @ChouhanShivraj @AgriGoI pic.twitter.com/fm7iZkUwKX
— PM Kisan Samman Nidhi (@pmkisanofficial) October 5, 2024
काय आहे पीएम किसान योजना?
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे. याअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी 2 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. शेतकऱ्यांना एका वर्षात एकूण 6,000 रुपये मिळतात, जे थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातात. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि त्यांना शेतीच्या कामात मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की, नाही? 'असे' करा चेक -
तुमचा 18 वा हप्ता तुमच्या खात्यात आला आहे की नाही हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल, तर तुम्हाला PM-KISAN pmkisan.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. तेथे 'नो युवर स्टेटस' टॅबवर क्लिक करा, तुमचा नोंदणी क्रमांक आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा. यानंतर 'डेटा मिळवा' वर क्लिक करा. यानंतर तुमचे स्टेटस तुम्हाला स्क्रीनवर दिसेल.