Indore Crime: चालत्या बाईकवरून हिसकावली 2 लाखांची बॅग, चोरीची घटना CCTV कॅमेरात कैद
robbery

Indore Crime: मध्य प्रदेशातील इंदौर शहरातील चंदन नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सायंकाळी एका गॅस एजन्सीच्या मालकाच्या दोन लाख रुपये लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. गॅस एसन्सीच्या मालकाच्या डोळ्यात लाल मिरची पावडर टाकून त्याच्या डोक्यात वार करुन लुटल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. (हेही वाचा-  दारूसाठी तीन वर्षांचं पोरगं विकलं, मित्रांसोबत पार्टी केली, 

मिळालेल्या माहितीनुसार. सायंकाळी ६ च्या सुमारास दुचाकीवरून जात असताना ही घटना घडली. गोविंद गुरनानी असे पीडितेचे नाव असून तो अन्नपूर्णा भागातील रहिवासी असून जवाहर टेकरी येथे च्याचे गॅस गोदाम आहे.  गोविंद हे जवाहर टेकरी येथील गॅस गोदामातून करबला येथील त्यांच्या कार्यालयाकडे दुचाकीवरून जात असताना ही घटना घडली.ते दस्तूर गार्डनजवळ आले असता दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी त्यांना अडवून मारहाण केली. आरोपीने त्याच्या डोक्यात मारले, डोळ्यात लाल मिरच्या टाकल्या आणि दोन लाख रुपये असलेली बॅग घेऊन पळ काढला.

दरोडेखोरांनी पीडिताचा मोबाईल फोन हिसकावून घेतला आणि तो फेकून दिला. पोलिसांना या घटनेची माहिती दिली. आरोपींनी पीडितेचा पाठलाग केला असवा असा पोलिसांचा अंदाज आहे. ही संपूर्ण घटना जवळच लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे.