Indigo Airlines Offers: इंडिगोच्या प्रवाशांना मिळणार आता लांब रांगेपासून मुक्तता, इंडिगोने सुरू केली 'ही' नवीन सेवा
indigo (pic credit - indigo twitter)

देशातील एअर लाईन्स (Airlines) कंपन्यामध्ये अग्रगण्य असलेली इंडिगो (Indigo) कंपनी ही ग्राहकांसाठी नवीन सेवा आणत असते. ग्राहकांचा प्रवास जास्त सोयीस्कर कसा होईल. याकडे कंपनी जास्त लक्ष देते. त्यामुळे कंपनीने आता नुकतीच ग्राहकांसाठी असण्याऱ्या एका सेवेची घोषणा केली आहे. देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने विमानतळांमधील बोर्डिंग गेटवर (Boarding gate) प्रवाशांना लांब रांगापासून वाचवण्यासाठी प्राधान्य बोर्डिंग सुविधा सुरू केली आहे.  इंडिगोने एका निवेदनात म्हटले आहे की ग्राहक या सुविधेचा वापर बुकिंग प्रक्रियेदरम्यान इंडिगोच्या वेबसाइटवर, मोबाईल अॅपवर किंवा ग्राहक सेवेला कॉल करून करू शकतात. या व्यतिरिक्त, ग्राहकांना ही सुविधा माय बुकिंग पोर्टल द्वारे नंतरच्या कालावधीसाठी फक्त 400 रुपये प्रति फ्लाईट शुल्काने बुक करता येईल.  देशातील सर्वात मोठ्या विमान कंपनीने सांगितले की सुरुवातीला ही सुविधा मोठ्या शहरांसाठी उपलब्ध असेल. मात्र नंतर ते संपूर्ण देशांतर्गत उड्डाण नेटवर्कसाठी टप्प्याटप्प्याने सुरू केले जाईल. कंपनीने सांगितले हा पर्याय प्रत्येक फ्लाइटमध्ये मर्यादित संख्येने प्रवाशांसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर उपलब्ध असेल.

इंडिगोचे मुख्य धोरण आणि महसूल अधिकारी संजय कुमार म्हणाले की, एअरलाईन नेहमी आपल्या ग्राहकांसाठी प्रवासाचा अनुभव वाढवण्याचा प्रयत्न करते. ते म्हणाले की, प्राधान्य बोर्डिंगमुळे ग्राहकांना बोर्डिंग गेटवर वेळ वाचण्यास मदत होणार नाही, तर कुटुंब आणि ज्येष्ठ नागरिकांना आराम मिळेल.आम्ही प्रवाशांसाठी सर्वात सुरक्षित पर्याय म्हणून हवाई प्रवास मजबूत करण्यासाठी उपाय आणि सेवांच्या दिशेने सतत काम करत आहोत. अशी त्यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली आहे. हेही वाचा नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्याविरोधात पत्नीची तक्रार, गुन्हा दाखल

इंडिगोने बरेली विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सुविधा वाढवल्या आहेत. खाजगी क्षेत्रातील इंडिगो विमान कंपनीने 12 ऑगस्ट रोजी मुंबई आणि 14 ऑगस्ट रोजी बेंगळुरूच्या उड्डाणांचे भाडे कमी केले आहे. नवीन वेळापत्रकात इंडिगो एअरलाईनने मुंबई विमानतळ ते बंगळूर विमानतळ, तर बरेली ते बेंगळुरू विमानतळ उड्डाणे मुंबई विमानतळापर्यंत वाढवली आहेत. इंडिगोने अहमदाबाद, चेन्नई, गोवा, जयपूर, कोलकाता, नागपूर, रायपूर, भुवनेश्वर, कोईम्बतूर, हैदराबाद, कानपूर, लखनौ, पटना, चंदीगड, दिल्ली, इंदूर, कोची, मंगलुरू, पुणे, वाराणसी आणि तिरुअनंतपुरम यांना कनेक्टिंग फ्लाइटद्वारे जोडण्याची घोषणा केली आहे. .