Indigo Flight (PC - Wikimedia Commons)

Indigo Flight Suffers Bird Hit: मंगळुरूहून दुबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाची पक्ष्याला धडक बसल्याने मोठा अपघात टळला. दुबईला जाणार्‍या इंडिगो विमानाने मंगळुरु आंतरराष्ट्रीय विमानतळावर (MIA) धावपट्टीवर पक्ष्याला धडक दिली. त्यामुळे उड्डाण रद्द करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. विमानाच्या एका पंखावर पक्षी आदळला. हे विमान उड्डाणासाठी तयार होते. पायलटने तात्काळ एअर ट्रॅफिक कंट्रोलला कळवले आणि फ्लाइट रद्द करण्यात आली. या घटनेनंतर 160 प्रवाशांना विमानातून उतरवण्यात आले.

या घटनेने विमानतळावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. नंतर, प्रवाशांना बंगळुरूहून आलेल्या दुबईच्या दुसर्‍या विमानात बसण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली. (हेही वाचा - Hyderabad Murder Case: हैदराबादमध्ये श्रद्धा हत्याकांडासारखे कृत्य! लिव्ह-इन पार्टनरने कटर मशिनने केले गर्लफ्रेंडच्या मृतदेहाचे 6 तुकडे)

सध्या ग्राउंड केलेल्या फ्लाइटची तंत्रज्ञांकडून तपासणी केली जात आहे. MIA अधिकाऱ्यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, 6E 1467 IXE-DXB ने टॅक्सीवेवरून धावपट्टीमध्ये प्रवेश करताना पक्ष्याला धडक दिली. पायलटने याची माहिती एटीसीला दिली. त्यानंतर सर्व प्रवाशांना उतरवण्यात आले.

तथापी, इंडिगोने फ्लाइटमध्ये बसलेल्या 165 प्रवाशांसाठी पर्यायी प्रवासाची व्यवस्था केली. नंतर दुबईचे पूर्वनिर्धारित विमान सकाळी 11.05 वाजता निघाले.