INS Visakhapatnam: भारतीय नौदलाला (Indian Navy) INS विशाखापट्टनमच्या (INS Visakhapatnam) रुपाने आणखी एक अस्त्र मिळणार आहे. प्रोजेक्ट 15 B वर्गातील ही पहिली युद्धनौका (War ship) आहे. INS विशाखापट्टनम ही स्टेल्थ गाईडेड मिसाइल डिस्ट्रॉयर आहे. या युद्धनौकेमुळे भारतीय नौदलाची समुद्राच्या पृष्ठभागावर आणि पाण्याच्या आत मारा करण्याची क्षमता वाढणार आहे. त्यामुळे भारताची ताकद आणखी वाढणार आहे. रविवारपासुन ही युद्धनौका सेवेत रुजू होणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) INS विशाखापट्टनमच्या जलावतारणाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. सकाळी 10 वाजता मुंबई डॉकयार्ड मध्ये राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत INS विशाखापट्टणम नौदलात दाखल झाली आहे.
She is vigilant,
She is valiant,
She shall always be victorious!
India’s first indigenous P15 Bravo destroyer ‘Visakhapatnam’ ready for commissioning.
Raksha Mantri Shri @rajnathsingh to attend the ceremony in Mumbai today. @indiannavy pic.twitter.com/p19NXxy6ua
— रक्षा मंत्री कार्यालय/ RMO India (@DefenceMinIndia) November 21, 2021
आयएनएस विशाखापट्टनम माझगाव डॉकयार्डमध्ये तयार करण्यात आली आहे. आयएनएस विशाखापट्टनम 163 मीटर लांब आणि 7400 टन वजनाची आहे. सर्फस टु एअर मिसाईल, ब्रह्मोस, टोरपीडो ट्यूब लॉचर, अँटी सबमरीन रॉकेट लॉचर, बीएचईएलची 76 एमएम सुपर रॅपिड सारखी हत्यारे आहेत. आता भारतीय नौदलात 130 युद्ध नौका आहेत. विशाखापट्टणम या युद्धनौकेची बांधणी स्वदेशी बनावटीच्या डीएमआर249 ए स्टीलचा वापर करून केली आहे. भारतात बांधण्यात आलेली ती सर्वात मोठी युद्धनौका आहे. (हे ही वाचा 7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा, सरकारी नियमात बदल, पाहा कोणाला किती आणि कसा मिळणार फायदा.)
Will be in Mumbai tomorrow, 21st November. Looking forward to attend the commissioning ceremony of INS Visakhapatnam.
The event marks the formal induction of the first of the four ‘Visakhapatnam’ class destroyers, into the Indian Navy. @indiannavy https://t.co/RqLbrku2g4 pic.twitter.com/TZdk73OIWO
— Rajnath Singh (@rajnathsingh) November 20, 2021
INS विशाखापट्टनमच्या जलावतारणासाठी आम्ही सज्ज आहोत. या युद्धनौकेच्या बांधणीत स्वदेशी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे. जलावतारणानंतर आणखी काही चाचण्या होतील" असे कॅप्टन बिरेंद्र सिंह यांनी सांगितले. ते INS विशाखापट्टनमचे कमांडिंग अधिकारी आहेत.
चार दिवसानंतर म्हणजेच 25 नोव्हेंबर रोजी स्कोर्पीन क्लासची चौथी पाणबुडी आयएनएस वेलाही भारताची समुद्रातील ताकद वाढवणार आहे. 25 तारखेला आयएनएस वेला नौदलात दाखल होणार आहे. या कार्यक्रमाला नौदलानचे प्रमुख एडमिरल करमबीर सिंह प्रमुख पाहुणे असणार आहेत.