KISS Humanitarian Award: जग प्रसिध्द भारतीय उद्योगपती आणि टाटा समुहाचे अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) यांना सोमवारी सामाजिक विकास आणि कॉपोरेट नेतृत्त्वाप्रती असलेल्या त्यांच्या वचनबध्दतेबद्दल प्रतिष्ठित कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मानवतावादी पुरस्कार 2021 ने सन्मानित करण्यात आला आहे. रतन टाटा यांची प्रकृतीमुळे सार्वजनिक हजेरी टाळत असल्यामुळे हा पुरस्कार सोहळा मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता. (हेही वाचा- गीतकार गुलजार यांना 2023 चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर)
या समारंभाला टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन आणि रिकी केज (तीन वेळा ग्रॅमी पुरस्कार) आदी उपस्थित होते. कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी आणि KISS चे संस्थापक अच्युता सामंता आणि कंधमालाचे खासदार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला टाटा समुहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी अच्युता सामंत यांच्या वैयक्तिक विनंतीनंतर हा पुरस्कार स्वीकारण्यास सहमती दर्शवली.
#kiittoday #kiituniversity #KIITat25
Ratan Tata Receives Prestigious
KISS Humanitarian Award
Renowned industrialist and philanthropist Ratan Tata, Chairman Emeritus of the Tata Group, was honored with the prestigious KISS Humanitarian Award 2021 on 22nd April, 2024. pic.twitter.com/U3Uef4dN6W
— Srinibas Das (@srinibasdas001) April 22, 2024
हा पुरस्कार 2021 मध्ये जाहीर करण्यात आला होता, परंतु श्री टाटा यांना कोविड महामारीमुळे हा पुरस्कार मिळू शकला नाही. हा पुरस्कार स्वीकारताना टाटा यांनी KISS आणि त्याचे संस्थापक यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली."हा सन्मान मिळाल्याने मी अत्यंत आनंदी आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण आहे", असे त्यांनी सांगितले.