Shashi Tharoor (PC- PTI)

काँग्रेस नेते शशी थरूर (Shashi Tharoor) हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. अनेकदा ते त्यांच्या टिप्पण्यांमुळे चर्चेत असतात. मात्र, यावेळी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवर कुवेतमधील भारतीय दूतावासाने त्यांना सल्ला दिला आहे. शशी थरूर यांनी 'पाकिस्तानी एजंट'च्या 'भारतविरोधी ट्विट'चे समर्थन केले आहे, असे दूतावासाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

एका पाकिस्तानी व्यक्तीने ट्विट केलं होतं की, कुवेतच्या काही खासदारांनी भारतातील सत्ताधारी पक्षाच्या कोणत्याही नेत्याला कुवेतमध्ये प्रवेश देऊ नये. शशी थरूर यांनी हे ट्विट रिट्विट केले आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'मुस्लिम मुलींवर अत्याचार होत आहेत आणि आम्ही हातावर हात ठेवून हे सर्व पाहू शकत नाही. एकत्र लढण्याचा हा दिवस आहे. (Y category security: केंद्र सरकारचा कुमार विश्वास यांना CRPF कव्हरसह Y श्रेणीची सुरक्षितता देण्याचा निर्णय)

या ट्विटला रिट्विट करत तिरुअनंतपुरमचे काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी लिहिले की, 'देशात केलेल्या कामाचे परिणाम जगाला दिसत आहेत.' थरूर म्हणाले की, त्यांनी ऐकले आहे की आखाती देशांतील लोकांनाही भीती वाटते की भारतात इस्लामोफोबिया वाढत आहे आणि पंतप्रधान मोदींना त्याचा निषेधही करावासा वाटत नाही.

त्यांनी ट्विट केलं आहे की, 'आखाती देशांतील लोकही म्हणू लागले की, आम्हाला भारत आवडतो, पण तुमच्याशी मैत्री करण्याची माझी कोणतीही सक्ती नाही.' थरूर यांच्या ट्विटला प्रत्युत्तर देताना भारतीय दूतावासाने म्हटले आहे की, “आम्हाला दु:ख होत आहे की सन्माननीय संसद सदस्य पाकिस्तानकडून पुरस्कार मिळवणाऱ्या एजंटवर अशी प्रतिक्रिया देत आहेत.

थरूर यांनी कुवेतमधील भारतीय दूतावासालाही ट्विटरवर प्रत्युत्तर दिले आणि म्हटले की, ही एकचं गोष्ट नाही तर अनेक असे लोक आहेत, जे भारताला आपला मित्र मानतात. आजकाल ते चिंतेत आहेत.