भारताने पाकिस्तानला चारली धूळ; उध्वस्त केले पाकिस्तान आर्मीचे मुख्यालय (व्हिडीओ)
भारताने उध्वस्त केलेले मुख्यालय (Photo credit: ANI)

आक्रमक झालेल्या पाकिस्तानला भारताने चांगलाच धडा शिकवला आहे. भारतीय लष्कराने पूंछजवळील लाईन ऑफ कंट्रोल (एलओसी) जवळच्या पाकिस्तान लष्कराच्या प्रशासनिक मुख्यालयावर हल्ला केला आहे. पाकिस्तानकडून झालेल्या फायरिंगनंतर भारतीय लष्कराने प्रत्युत्तरादाखल ही कारवाई केल्याची माहिती आहे. भारतीय सैन्याने केलेल्या या कारवाईत पाकिस्तानी सैन्याचे मोठे नुकसान झाले आहे. भारतीय सैन्याने केलेल्या या ऑपरेशननंतर आज सोमवारी याचे सॅटेलाईट फोटो प्रसारित करण्यात आले आहेत.

23 ऑक्टोबर रोजी पुंछ जिल्ह्यातील एलओसीवर पाकिस्तानकडून हल्ला आणि गोळीबार करण्यात आला होता. भारतीय सैन्याने या गोळीबाराला प्रत्युत्तर देत सर्जिकल स्ट्राईक प्रमाणेच नियंत्रण रेषेजवळील पाकिस्तान सैन्य प्रशासनाचे मुख्यालय उद्ध्वस्त केले आहे. मिळालेल्या अधिक माहिती नुसार 21 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्यात तीन भारतीय जवान शहीद झाले होते. तर एक जवान जखमी झाला होता. याबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा होऊनसुद्धा परत पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. त्यानंतर मात्र चिडलेल्या भारतीय लष्कराने पाकिस्तानचे मुख्यालय उध्वस्त करून पाकिस्तानला चांगलीच धूळ चारली आहे.