Indian Aircraft

भारतीय हवाई दलाचे (Indian Air Force) मिग-21 (MiG 21) हे लढाऊ विमान आज संध्याकाळी राजस्थानमधील जैसलमेरजवळ कोसळले (Crash). सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानात उपस्थित असलेल्या पायलटचा शोध सुरू आहे. आतापर्यंत वैमानिकाचा काहीही शोध लागलेला नाही. 25 ऑगस्ट रोजी बाडमेरमध्ये प्रशिक्षणा दरम्यान हवाई दलाचे मिग-21 बायसन लढाऊ विमान कोसळले होते. मात्र, विमानाचा पायलट सुरक्षित होता. मात्र आजच्या अपघातात पायलटचा अद्याप काहीही पत्ता लागलेला नाही. वैमानिकाचा शोध सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. जैसलमेरमध्ये पाकिस्तान सीमेजवळ मिग-21 विमान कोसळले आहे.  लष्कराचे लढाऊ विमान कोसळल्यानंतर ते सुदासरी डेझर्ट नॅशनल पार्कमध्ये पडले.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान शुक्रवारी रात्री जैसलमेरमध्ये कोसळले. जैसलमेरचे एसपी अजय सिंह यांनी सांगितले की, विमान साम पोलीस स्टेशन परिसरातील डेझर्ट नॅशनल पार्क परिसरात कोसळले.  एसपी म्हणाले की स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत आणि ते देखील अपघाताच्या ठिकाणी जात आहेत. हवाई दलाच्या विमानाला अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही मिग-21 विमाने अपघाताला बळी पडली आहेत.