Puducherry Exit Polls 2021 Prediction: पुडुचेरीमध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेत येणार की भाजप मारणार बाजी? येथे पाहा एबीपी सी-व्होटरच्या एक्झिट पोलचा अंदाज
पीएम मोदी व राहुल गांधी (Photo Credits: PTI/file)

पश्चिम बंगाल (West Bengal), तामिळनाडू (Tamil Nadu), केरळ (Kerala), असम (Assam), आणि केंद्र शासित प्रदेश पुडुचेरी (Puducherry) अशा 5 राज्यांतील निवडणुकीची रणधुमाळी आज थांबली आहे. या निवडणुकींचा निकाल येत्या 2 मे ला जाहीर केला जाणार आहे. या पाचही राज्यातील विधानसभा निकालांपूर्वी मतदारांसह देशातील जनतेला कोणत्या राज्यात कोणाची सत्ता येणार? याची उत्सुकता लागली आहे. यामुळे प्रत्येकजण एक्झिट पोलची वाट पाहत होता. एक्झिट पोलनुसार, पुडुचेरीमध्ये भाजप युतीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. तर, कॉंग्रेस आघाडीला सत्ता टिकवणे अवघड असल्याचे चिन्ह दिसू लागले आहे.

एबीपी सी-व्होटरच्या एक्झिट पोलनुसार, पुडुचेरीमध्ये भाजप युतीचे सरकार सत्तेचा झेंडा फडकवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. पुडुचेरी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या 19 ते 23 जागा जिंकूण येण्याची शक्यता आहे. तर, काँग्रेसला मोठा धक्का बसताना दिसत आहे. काँग्रेसला 6 ते 10 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर, अन्य 1 ते 2 जागा निवडून येणार असल्याचे सांगितले जात आहे. हे देखील वाचा- ABP C Voter Exit Poll Result 2021: पुदुचेरी मध्ये भाजपाला 19-23 जागा मिळण्याची शक्यता

ट्विट-

पुडुचेरी हे एक केंद्र शासित राज्य आहे. काँग्रेसने गेल्या विधानसभा निवडणुकीत 21 जागांपैकी सर्वाधिक 15 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर एआयएडीएमकेला 4, एआयएनआरसीला 8, डीएमकेला 2 आणि इतरला 1 जागा मिळाली होती. पुद्दुचेरीमध्ये काँग्रेस आणि डीएमकेमध्ये युती आहे. तर एआयएडीएमके आणि एआयएनआरसी विरोधी पक्ष आहेत. पुडुचेरीत आता 30 विधानसभेच्या जागांसाठी निवडणूक पार पडली आहे. येथे बहुमत मिळवण्यासाठी 16 जागा जिंकण्याची आवश्यकता आहे.