Moradabad Road Accident (PC - ANI)

Moradabad: उत्तर प्रदेशातील मुरादाबाद (Moradabad) येथे शनिवारी सकाळी एक मोठा रस्ता अपघात झाला. या रस्ता अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात सुमारे 24 लोक जखमी झाले आहेत. तीन वाहनांमध्ये जोरदार टक्कर झाल्यामुळे हा अपघात झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. कुंदरकी पोलिस स्टेशन परिसरातील मुरादाबाद-आग्रा महामार्गावर हा अपघात झाला. आतापर्यंत अपघाताचे कारण स्पष्टपणे कळू शकले नाही. ओवरटेक केल्याने हा अपघात झाल्याचं घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या प्रवाशांनी सांगितलं आहे.

या घटनेवर एसएसपी म्हणाले, 'फॉरेन्सिक टीम येथे आहे. बचाव कार्य जवळजवळ पूर्ण झाले आहे. 3 वाहने धडकल्यानंतर हा अपघात झाला. प्रत्यक्षात हा प्रसंग पाहणाऱ्यांच्या मते ओवरटेक केल्याने ही घटना घडली.' (वाचा - Myntra लवकरच बदलणार Logo; महिलांसाठी अपमानास्पद असल्याची तक्रार Mumbai Cyber Police कडे दाखल)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खासगी बस कुंदारकीहून प्रवाशांसह मुरादाबादकडे जात होती. बस मुरादाबाद-आग्रा महामार्गाजवळ आली त्यावेळी समोरून आलेल्या ट्रकने बसला धडक दिली. या अपघातात बसचा पुढचा भाग खराब झाला. यावेळी तिसऱ्या वाहनानेही बसला धडक दिली.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख आणि जखमींना 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. जखमींना पुरेशी वैद्यकीय सेवा पुरविण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.