HIV ग्रस्त शेजाऱ्याकडून अल्पवीन मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: ANI)

गुजरात येथे एका 35 वर्षीय व्यक्तीने 9 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी हा पेशाने शिंपी असून या पीडित मुलीला ड्रेसचे माप घेण्याच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार केला. असे सांगितले जात आहे की, आरोपी विवाहित असून ज्या पीडित मुलीवर बलात्कार केला आहे ती मुलगी त्याच्या मुलीची मैत्रिण आहे. घटना उघडकीस आल्यानंतर चौक बजार पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तसेच पोक्सो अॅक्टनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी या घटनेप्रकरणी तपासणी केल्यास आरोपी रमेश (बदलेले नाव) हा एचआयव्ही (HIV) आजाराने ग्रस्त आहे. तसेच रमेशला दोन लहान मुले आहेत. मात्र पीडित अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याने तिला सुद्धा एचआयव्हीची लागण होईल का याची चिंता सतावू लागली आहे. परंतु डॉक्टरांकडे जाऊन चाचणी केली असल्याने अद्याप त्यांनी काही स्पष्टपणे सांगितले नाही.

बलात्कार केल्यानंतप पीडीत अल्पवयीन मुलगी शांतशांत आणि एकटीच राहू लागली होती. तसेच आरोपीने बलात्कार केल्याचे कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिली होती. मात्र सोमवारी ही मुलगी शाळेतून घरी आली त्यावेळी तिच्यावर बलात्कार झाल्याचा धक्कादायक खुलासा झाला. त्यावेळी आईसमोर पीडीत मुलगी जोरजोराने रडू लागल्याने आईने तिला याबद्दल विचारले. तेव्हा मुलीने आपल्यावर बलात्कार झाल्याचे तिला उघडपणे सांगितले.

पीडित मुलीच्या घरातील मंडळींनी तातडीने पोलिसात धाव घेत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच ड्रेस शिवून देतो यासाठी माप घ्यावे लागेल असा बहाणा करत हे कृत केल्याचे पीडित मुलीने पोलिसांना सांगितले. तसेच बलात्कारावेळी अश्लील व्हिडिओ दाखवले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करण्यासाठी त्याच्या दुकानात दाखल झाले त्यावेळी आरोपी तेथून पळ काढू लागला. परंतु पोलिसांनी अखेर त्याचा पाठलाग करुन त्याला अटक केली आहे.