Sharjeel Imam Bail: शरजील इमाम याला मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) बुधवारी शरजीलला जामीन मंजूर केला आहे. दिल्लीच्या जामिया परिसरात आणि अलीगढ मुस्लिम विद्यापीठात (एएमयू) प्रक्षोभक भाषणे केल्याप्रकरणी शरजीलवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिल्ली पोलिसांच्या विशेष गुन्हे शाखेने शरजीलला अटकही केली होती. शरजील इमाम याच्यावर देशद्रोह आणि बेकायदेशीर कृत्ये केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. २८ जानेवारी २०२० रोजी कोर्टाने शरजीलला ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर शरजीलची रवानगी तुरुंगात करण्यात आली.
दरम्यान, जामीनासाठी शरजीललने दिल्ली हायकोर्टात याचिका केली होती. आज बुधवारी त्याच्या जामीन याचिकेवर सुनावणी पार पडली. त्यावेळी त्याच्या वकिलांकडून युक्तीवाद करण्यात आला. त्यावर कोर्टाने विचार करून शरजील याला जामीन मंजूर केला. 'शरजील इमामने ७ वर्षांच्या शिक्षेपैकी निम्मी शिक्षा भोगली असून त्याला जामीन मंजूर करावा', असा युक्तीवाद त्याच्या वकिलांनी केला होता.
मात्र, दिल्ली दंगलीप्रकरणी शर्जील इमामवर गुन्हा दाखल करण्यात आला होती. त्या प्रकरणातील गुन्ह्यामुळे तरी सध्या त्याला तुरुंगातच राहावे लागणार आहे. त्या प्रकरणात त्याला अद्याप जामीन मिळालेला नाही.
शरजील इमामच्या वकिलाने काय युक्तिवाद केला?
शरजील इमामच्या वतीने वकील तालिब मुस्तफा आणि अहमद इब्राहिम यांनी बाजू मांडली. दिल्ली पोलिसांच्या वतीने एसपीपी रजत नायर कोर्टात हजर झाले होते. वकिल मुस्तफा यांनी सांगितले की, UAPA प्रकरणात कोणत्याही आरोपीला जास्तीत जास्त ७ वर्षांची शिक्षा होऊ शकते. शरजीलने याआधीच ४ वर्षे आणि ७ महिन्यांची कमाल सात वर्षांची शिक्षा भोगली आहे. त्यामुळे तो जामीनास पात्र असून शरजील इमामला जामीन द्यावा अशी मागणी वकिलांनी केली. वकिल मुस्तफा यांची मागणी मान्य करत कोर्टाने शरजील इमानला जामीन मंजूर केला.