HC on Same-Sex Couple: समलिंगी जोडप्याला (Lesbian Couple) एकत्र राहण्याचा अधिकार (Right to live) असल्याचे आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे. समलैंगिकांना त्यांचा जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य आहे, असेही न्यायालयाने (Andhra Pradesh High Court) म्हटले आहे. न्यायमूर्ती आर रघुनंदन राव आणि के महेश्वरा राव यांच्या खंडपीठासमोर महिलेने दाखल केलेल्या हेबियस कॉर्पस याचिकेवर सुनावणी सुरू होती. किंबहुना, याचिकेत आरोप होता की तिच्या जोडीदाराला तिच्या वडिलांनी तिच्या इच्छेविरुद्ध नरसीपट्टणम येथील त्यांच्या घरी कैद केले होते. (Madhya Pradesh: सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू; मध्यप्रदेशमधील घटना)
त्यावर न्यायालयाने मंगळवारी याचिकाकर्त्यांच्या पालकांना या जोडप्याच्या नात्यात ढवळाढवळ न करण्याचे निर्देश दिले. मुलगी प्रौढ आहे आणि ती स्वत: निर्णय घेऊ शकते. समलिंगी जोडपे गेल्या एक वर्षापासून विजयवाडा येथे राहत होते. खंडपीठाने याचिका निकाली काढताना, महिलेच्या कुटुंबीयांवर कोणतीही फौजदारी कारवाई करू नये, असेही म्हटले आहे.
महिलेने जोडीदार हरवल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तपास केला तेव्हा ती तिच्या वडिलांच्या घरी सापडली, तिथून तिची सुटका करण्यात आली. यानंतर, तिला 15 दिवस कल्याण गृहात ठेवण्यात आले. या आधी सप्टेंबरमध्ये तिच्या वडिलांविरोधात तक्रार दाखल केली होती. ज्यामध्ये तिचे पालक आपला छळ करत असल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर ललिता विजयवाडा येथे परतली आणि कामावर जाऊ लागली.