Haryana two Prisoners Commited Suicide: हरियाणाच्या नुहान तुरुंगात दोन कैद्यांनी केली आत्महत्या, नातेवाईकांनी जेल बाहेर केला राडा
Dead Body | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

Haryana two Prisoners Commited Suicide: हरियाणाच्या नुहान तुरुंगात दोन कैद्यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, सोमवारी रात्री दोन्ही कैद्यांचे मृतदेह तुरुंगाच्या बॅरेकच्या बाथरूममध्ये दोरीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी सांगितले की, दोन्ही आरोपींना 29 जून रोजी लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत वेगवेगळ्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच दोन्ही मृतांच्या नातेवाईकांनी कारागृहाबाहेर जमून कटाचा आरोप केला, मात्र कारागृह प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील खलीलपूर गावातील रहिवासी नारायण (22) आणि हरियाणातील पलवल जिल्ह्यातील रंसिका गावातील रहिवासी वकील (23) अशी मृतांची नावे आहेत.

नारायण आणि इतर दोघांविरुद्ध 11 एप्रिल रोजी पिंगावन पोलिस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला होता. कारागृह अधीक्षक बिमला म्हणाल्या, “दोन्ही कैद्यांनी आत्महत्या केली आहे. कर्तव्यदंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.