PM Narendra Modi Birthday: आज पंतप्रधान मोदींचा (PM Narendra Modi) 73 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांना देशभरातून अभिनंदनाचे संदेश येत आहेत. अनेकांनी अनोख्या पद्धतीने पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आहे. वास्तविक, पीएम मोदींचा वाढदिवस खास बनवण्यासाठी भाजप आजपासून 2 ऑक्टोबरपर्यंत सेवा पखवाडा साजरा करत आहे. तसेच मोदींचे चाहते त्यांचा वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करत आहेत.
लखनऊमध्ये सुनील त्रिवेदी नावाच्या व्यक्तीने 1900 पानांवर पंतप्रधानांचे नाव 1.25 लाख वेळा लिहिले आहे. ओडिशातील कटक येथील स्मोक आर्टिस्ट दीपक बिस्वाल यांनी मोदींचे अनोखे स्मोक पेंटिंग बनवले आहे. अहमदाबादमध्ये मुलांनी पंतप्रधानांचा वाढदिवस क्रूझवर साजरा केला, तर लखनऊमध्ये अपंगांनी पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त 1.25 किमी लांब वाढदिवसाचे कार्ड बनवले. याशिवाय एका ठिकाणी पंतप्रधानांना दुधाचा अभिषेकही करण्यात आला. (हेही वाचा - PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींच्या जन्मदिवसाच्या निम्मीत्ताने सूरतच्या रिक्षाचालकांची ग्राहकांना विशेष सुट)
#WATCH | Lucknow, UP: Specially abled people prepared 1.25 km long birthday card ahead of PM Narendra Modi's birthday pic.twitter.com/qs1Gnv1RQT
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) September 16, 2023
#WATCH | Odisha: A Cuttack-based smoke artist, Deepak Biswal makes a portrait of PM Narendra Modi for his 73rd birthday.
PM Modi is celebrating his birthday today, 17th September. pic.twitter.com/xo752bW5z7
— ANI (@ANI) September 16, 2023
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी देशाला अनेक रिटर्न गिफ्टही देणार आहेत. PM मोदी आज विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ करणार आहेत, जी देशातील करोडो कामगार आणि कारागीरांच्या कौशल्याचा गौरव करेल. याशिवाय पंतप्रधान दिल्लीतील द्वारका येथे आशियातील सर्वात मोठ्या इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्स्पो सेंटरचे उद्घाटन करतील. यादरम्यान ते द्वारका सेक्टर 21 ते सेक्टर 25 पर्यंतच्या मेट्रो रेल्वे मार्गाचे उद्घाटनही करतील.