Global Top 10 Congested Cities in 2020: कोविड-19 लॉकडाऊन असूनही जगातील सर्वाधिक गर्दीच्या शहरांच्या यादीत मुंबई दुसऱ्या स्थानी; बंगळुरु, नवी दिल्लीचाही समावेश
Traffic | Representational Image | (Photo Credits: PTI)

जगभरातील 2020 मधल्या टॉप 10 गर्दीच्या शहरांमध्ये भारतातील मुंबई (Mumbai) , बंगळुरु (Bangalore) आणि नवी दिल्लीचा (New Delhi) समावेश आहे. भारताची आर्थिक राजधानी मुंबई या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असून बंगळुरु सहाव्या क्रमांकावर तर नवी दिल्ली आठव्या क्रमांकावर आहे. असे टाईम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे. यापूर्वी 2018 आणि 2019 च्या यादीमध्ये मुंबईचा चौथा क्रमांक होता. मुंबईतील ट्रॅफिक कन्जेशनमुळे मुंबईतील ड्रायव्हर्संना सरासरी 53 टक्के अधिक वेळ प्रवास करण्यास लागतो.

टॉप 10 गर्दीच्या शहरांच्या यादीमध्ये मॉक्सो शहराला प्रथम स्थान मिळाले आहे. या यादीमध्ये बोगोटा, मनिला, इस्तानबुल, युक्रेनमधील केव्हायआयव्ही तर रशियामधील Novosibirsk  आणि बँकॉक या शहरांचा समावेश आहे. TomTom Traffic Index ने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमधील ट्रॅफिक कन्जेशन सर्वाधिक असल्याचे निर्दशनास आले आहे.

मुंबई शहरातील रस्त्यांची रुंदी आणि वाढत्या गाड्या यांचे संतुलन नसल्यामुळे टॉप 10 गर्दीच्या शहरांच्या यादीत मुंबईचा दुसरा क्रमांक लागतो. मुंबईतील गाड्यांचे प्रमाण 1900/किमी इतके आहे. हे प्रमाण महाराष्ट्र राज्यातील गाड्यांच्या प्रमाणापेक्षा 15 पटीने अधिक आहे.

जगभरातील 57 देशांमधल्या 416 शहारांचा अभ्यास केल्यानंतर TomTom Traffic Index ने ही यादी जारी केली आहे. मुंबई मधील ट्रॅफिक कन्जेशन हे 12 टक्क्यांनी कमी झाले आहे. तर बंगळुरुमधील ट्रॅफिक कन्जेशन 51 टक्के इतके होते. तर दिल्लीत सर्वाधिक म्हणजे 71 टक्के ट्रॅफिक कन्जेशन दिसून आले.

दरम्यान, TomTom Traffic Index चे इंटरप्राईज सेल्स मॅनेजर पराग बेडारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविड-19 संकटामुळे संपूर्ण जगभरातील ट्रॅफिक कन्जेशन कमी झाले आहे. सकाळच्या गर्दीच्या काळात मुंबईमध्ये होणारे ट्रॅफिक 18 टक्क्यांनी कमी झाले असून संध्याकाळच्या rush hours मधील ट्रॅफिक 17 टक्क्यांनी कमी झाले आहे. लॉकडाऊन काळामध्ये भरपूर कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडल्यामुळे ट्रॅफिक कमी होण्यास मदत झाली, असे बेडारकर यांचे म्हणणे आहे.