Fraud: राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा खेळण्याची संधी देण्याचे आश्वासन देत घातला 27.10 लाखांचा गंडा, सुरतमध्ये माजी रणजी ट्रॉफी खेळाडूला अटक
Arrested | Representational Image | (Photo Credits: Facebook)

सुरतच्या (Surat) आर्थिक गुन्हे शाखेने (Crime Branch) 26 जानेवारीला हिमाचल प्रदेशमधील माजी रणजी ट्रॉफी खेळाडू सपना रंधावाला (Former Ranji Trophy player Sapna Randhawala) सूरतमध्ये राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा खेळण्याची संधी देऊन 27.10 लाख रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी अटक केली.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरतमधील लालभाई क्रिकेट अकादमीमध्ये खेळणारा क्रिकेटपटू भाविक पटेल याने 20जानेवारीला सुरत शहर गुन्हे शाखेकडे रंधवाविरोधात तक्रार दाखल केली होती. रणजी ट्रॉफी क्रिकेट सामने, टी20 चा एकच सामना, तीन एकदिवसीय सामने आणि कसोटी क्रिकेटचे दोन सामने खेळू देण्यासाठी सपनाने आपल्याकडून 27.10 लाख रुपये घेतल्याचा आरोप पटेल यांनी आपल्या तक्रारीत केला होता.

2019 मध्ये हैदराबादमध्ये झारखंड क्रिकेट असोसिएशन संघाविरुद्ध नागालँड क्रिकेट असोसिएशनकडून फक्त एकच रणजी ट्रॉफी सामना खेळला असल्याचा दावा पटेलने केला. जेव्हा त्याने रंधावाला इतर सामन्यांबद्दल विचारले तेव्हा तिने वेगवेगळी सबबी सांगितली आणि नंतर त्याचे फोन कॉल घेणे बंद केले, असा आरोप पटेल यांनी केला. रंधावाला ट्रान्झिट रिमांडवर सुरतला आणून गुरुवारी सुरत जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. सुरत न्यायालयाने तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. हेही वाचा Crime: मुंबईत रूममेटची हत्या केल्याप्रकरणी 19 वर्षीय तरुण अटकेत

या प्रकरणाबाबत अधिक माहिती देताना, सुरतचे पोलीस आयुक्त अजय कुमार तोमर म्हणाले, भाविक पटेलची सपना रंधावाशी ओळख राम चौहान नावाच्या एका व्यक्तीने केली होती. ज्याने 2018 मध्ये उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एक क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. ज्यामध्ये पटेल देखील खेळला होता. रंधावाने पटेलला सांगितले की, राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट स्पर्धेत खेळण्यासाठी आपल्याला रोख पैसे द्यावे लागतील.

सपना आणि इतरांनी भाविक पटेलची बनावट कागदपत्रे तयार करून त्याला नागालँड क्रिकेट असोसिएशनकडून हैदराबाद येथे झारखंडविरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यात खेळू दिले. ते पुढे म्हणाले, आम्ही बीसीसीआयकडे या प्रकरणात अधिक तपशील मिळविण्यासाठी मदत मागितली आहे. या टोळीमध्ये आणखी काही लोक आहेत जे सध्या फरार आहेत.परंतु आम्ही त्यांना लवकरच अटक करू.