Mukhtar Ansari (PC - ANI)

Mukhtar Ansari Gets Life Sentence: उत्तर प्रदेशच्या बांदा तुरुंगात बंद असलेला माफिया मुख्तार अन्सारी (Mukhtar Ansari) याला बनावट शस्त्र परवान्याशी संबंधित एका प्रकरणात (Fake Arms License Case) आज जन्मठेपेची शिक्षा (Life Sentence) सुनावण्यात आली आहे. वाराणसीच्या न्यायालयाने मंगळवारी मुख्तार अन्सारी यांना 36 वर्षे जुन्या प्रकरणात दोषी ठरवले. या प्रकरणी माजी आमदाराविरुद्ध आयपीसी कलम 466/120B, 420/120, 468/120 आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माफिया मुख्तार अन्सारी यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी 10 जून 1987 रोजी गाझीपूरच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना डबल बॅरल गनच्या परवान्यासाठी अर्ज दिला होता. जिल्हादंडाधिकारी व पोलीस अधीक्षकांच्या बनावट स्वाक्षरीने शिफारशी मिळवून शस्त्र परवाना काढण्यात आला. फसवणूक उघडकीस आल्यानंतर, सीबीसीआयडीने 4 डिसेंबर 1990 रोजी मुहम्मदाबाद पोलिस ठाण्यात मुख्तार आणि तत्कालीन उपजिल्हाधिकारी यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. (हेही वाचा -Mukhtar Ansari Gangster Case: गँगस्टर प्रकरणात माफिया मुख्तार अन्सारीला 10 वर्षांची शिक्षा आणि 5 लाखांचा दंड)

या प्रकरणाच्या तपासानंतर तत्कालीन आयुध लिपिक गौरीशंकर श्रीवास्तव आणि मुख्तार अन्सारी यांच्याविरुद्ध 1997 साली न्यायालयात आरोपपत्र पाठवण्यात आले होते. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान गौरीशंकर श्रीवास्तव यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्यावरील खटला 18 ऑगस्ट 2021 रोजी संपुष्टात आला. मात्र मुख्तारविरोधात न्यायालयात सुनावणी सुरू होती. आज अखेर मुख्तार यांच्या शिक्षेची घोषणा झाली आहे.