Representational Image (Photo Credits: ANI)

कर्नाटक पोलिसांनी (Karnataka Police) बुधवारी मंड्या (Mandya) जिल्ह्यातील नागमंगला (Nagamangala) शहरात एका व्यक्तीवर नवीन धर्मांतर विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. युनाश पाशा नावाच्या या व्यक्तीवर मुलीचे आक्षेपार्ह फोटो काढल्याचा आणि लग्नासाठी तिचा छळ केल्याचा आरोप आहे. पाशा यांच्यावर नवीन धर्मांतरविरोधी कायदा आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंड्यातील नागमंगला शहरात आरोपींनी सांभार मिसळून झोपेच्या गोळ्या दिल्याची तक्रार 13 वर्षीय तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे केली आहे. हेही वाचा Bangalore Shocker: पैशाची परतफेड करण्यास नकार दिल्याने मित्राची केली हत्या, नंतर मृतदेहासह व्यक्ती पोहोचला पोलिस स्टेशनमध्ये, अधिकारी झाले अवाक्

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 आणि 13 नोव्हेंबरला त्यांची मुलगी तणावात असल्याचे दिसल्यानंतर तिच्या वडिलांनी 18 नोव्हेंबरला तक्रार दाखल केली. तथापि, मुलीने देखील कबूल केले की 11 नोव्हेंबर रोजी ते त्यांच्या आजीच्या आवारात असताना आरोपीने तिचे लैंगिक शोषण केले. ती पुढे म्हणाली की तो (पाशा) तिच्याशी सतत बोलत असे आणि यापूर्वी त्याने तिला मोबाईल फोन आणि सिम कार्ड पाठवले होते.