Fire breaks out at an oil warehouse in Chennai (PC - ANI)

चेन्नईतील (Chennai) माधवाराम परिसरातील (Madhavaram Area) तेलाच्या गोदामाला (Oil Warehouse) भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 12 गाड्या दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. यासंदर्भात एएनआय (ANI) या वृत्तसंस्थेने वृत्त दिलं आहे.

अद्याप आगीचे कारण समजू शकलेले नाही. चेन्नईतील माधवाराम परिसरातील तेलाच्या गोदामाला ही आग लागली आहे. आगीमुळे गोदामातील तेलाचा फडका जास्तचं वाढत आहे. तसेच या आगीमुळे माधवाराम परिसरात सर्वत्र धुराचे लोळ पसरले आहेत. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. (हेही वाचा - एस. एन. श्रीवास्तव यांनी दिल्ली पोलिस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला;29 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)

या गोदामात अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र, अद्याप कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थिचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीची माहिती मिळताचं घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या 12 गाड्या दाखल झाल्या आहेत. मागील काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये एका कारखान्याला लागलेल्या आगीत अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता.