Vaibhav Gehlot: राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव याच्यावर फसवणुकीचा आरोप, नाशिक येथे FIR दाखल
Vaibhav Gehloat (Photo Credit - FB)

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Rajasthan Cm Ashoak Gehlot) यांचा मुलगा वैभव गेहलोत (Vaibhav Gehlot) याच्यावर कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकच्या एका रहिवाशाने एफआयआर (FIR) दाखल केला आहे. गंगापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख यांनी सांगितले की, राजस्थान (Rajasthan) आणि गुजरातमधील (Gujarat) 16 जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करत सुशील पाटील (Sushil Patil) नावाच्या व्यक्तीने एफआयआर दाखल केला आहे. घटनेचे वर्णन करताना, तक्रारदार सुशील पाटील म्हणाले की, सचिन वाल्रे या गुजरात काँग्रेसचा कार्यकर्ता याने त्याला 2018 मध्ये आश्वासन दिले होते की तो अशोक गेहलोतच्या जवळचा आहे आणि राज्य सरकारने दिलेला सरकारी करार तो सांभाळतो.

पाटील म्हणाले की त्यांनी मला सरकारी कंत्राटे सांभाळणाऱ्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत भागीदार होण्यास सांगितले. त्या कंपनीमार्फत मी 6.80 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. माझ्या गुंतवणुकीवर परतावा मिळणे थांबले तेव्हा मी त्यांच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली. यानंतर माझ्या आणि वैभव गेहलोतमध्ये व्हिडिओ कॉलची व्यवस्था करण्यात आली. जिथे गेहलोत यांनी मला माझ्या गुंतवणुकीवर परतावा देण्याचे आश्वासन दिले.

पाटील यांनी एफआयआर नोंदवल्यानंतर त्यांच्या सुरक्षेबाबत भीती वाटत असल्याने त्यांनी सरकारी सुरक्षाही मागितली आहे. ते म्हणाले की, मी शक्तिशाली लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. मला माझ्या जीवाची भीती वाटते. भाजपच्या राजस्थान युनिटने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा आणि राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे (आरसीए) अध्यक्ष वैभव गेहलोत यांच्यावर राज्याच्या पर्यटन विभागातील कामाच्या निविदांमध्ये कथित फसवणूक केल्याप्रकरणी निशाणा साधला आहे. (हे देखील वाचा: Bhagwant Mann: पंजाबमध्ये भ्राष्टाचार विरोधात 'आप' सरकार सक्रीय, मुख्यमंत्री भगवंत मान यांनी जाहीर करणार Helpline Number)

Tweet

आरोप लावले फेटाळून

वैभव गेहलोत यांनी आरोप फेटाळून लावले असून निवडणुका जवळ आल्यावर अशा आणखी गोष्टी समोर येतील असे म्हटले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी एका मराठी वृत्तवाहिनीची व्हिडिओ क्लिप शेअर करताना ट्विट केले की, या मराठी बातम्यांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मुलाचे नाव झळकत आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी परिस्थिती स्पष्ट करावी. राजस्थानच्या जनतेला फक्त सत्य जाणून घ्यायचे आहे. दुसरीकडे, वैभव गेहलोतने आपली बाजू मांडत ट्विट केले आहे की, एका एपिसोडबाबत मीडियामध्ये काहीतरी सुरू आहे, ज्यामध्ये माझे नावही टाकण्यात आले आहे. मला त्याच्याबद्दल काहीही माहिती नाही आणि माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही.