Petrol-Diesel Price | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत. पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमतीने प्रति बॅरल 81 डॉलरचा टप्पा पार केला आहे. मंगळवारच्या व्यापारात, ब्रेंट क्रूडची किंमत 0.31 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल $ 81.12 वर पोहोचली. त्याच वेळी, WTI क्रूडची किंमत 0.43 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल $ 78.57 वर पोहोचली. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असतानाच देशात पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी मंगळवार, 11 जानेवारीसाठी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. 69 दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल झालेला नाही. सरकारने गेल्या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 5 आणि 10 रुपयांची कपात केली होती. यानंतर तेलाच्या किमती खाली आल्या.

महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

मुंबईत आज पेट्रोलचा दर 109.98 रुपये प्रतिलिटर आहे, तर एक लिटर डिझेलचा दर 94.14 रुपये आहे. राजधानी दिल्लीत आज पेट्रोलचा दर 95.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 86.67 रुपये प्रति लिटर आहे.

तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 101.40 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 91.43 रुपये आहे. त्याच वेळी, कोलकातामध्ये आज पेट्रोलचा दर प्रति लिटर 104.67 रुपये आणि डिझेलचा दर 89.79 रुपये प्रति लिटर आहे. (हे ही वाचा Aadhaar Card: आता घरबसल्या आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर किंवा नाव-पत्ता करु शकता अपडेट, हा आहे सोपा पर्याय)

याप्रमाणे दर तपासा

इंडियन ऑइलचे ग्राहक RSP सोबत सिटी कोड टाकून त्यांच्या मोबाईलवरून 9224992249 या नंबर वर SMS करु शकतात. तुम्हाला इंडियन ऑइल (IOCL) च्या अधिकृत वेबसाइटवर शहर कोड मिळुन जाईल.

SMS पाठवल्यानंतर तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलची नवीन किंमत पाठवली जाईल. त्याचप्रमाणे, BPCL ग्राहक त्यांच्या मोबाईलवरून RSP टाइप करून 9223112222 वर SMS पाठवू शकतात. तसेच HPCL ग्राहक 9222201122 वर HPPprice टाइप करून SMS पाठवू शकतात.