कुत्र्याला फिरायला घेऊन जाण्यासाठी संपूर्ण स्टेडियम रिकामे करणाऱ्या IAS अधिकाऱ्याने केलेल्या टीकेदरम्यान पूरग्रस्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी चिखलात फिरुन मागेपुढे न पाहणाऱ्या महिला आयएएस (IAS) अधिकाऱ्याचा फोटो समोर आले आहेत. भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी कीर्ती जल्ली (Keerthi Jalli) यांची आसामच्या कचार जिल्ह्यातील पूरग्रस्त (Assam Flood) भागातील फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहेत. पूरग्रस्त लोकांपर्यंत पोहोचल्याबद्दल लोक या महिला उपायुक्तांचे जोरदार कौतुक करत आहेत. आसाममधील कचार जिल्हा हा अलीकडील पुरामुळे सर्वाधिक प्रभावित झाला आहे आणि 54,000 हून अधिक लोक अजूनही संपूर्ण जिल्ह्यातील 259 मदत छावण्यांमध्ये आश्रय घेत आहेत. डीसी कीर्ती जल्ली यांनी बुधवारी बोरखोला विकास गटांतर्गत विविध पूरग्रस्त भाग आणि इतर भागांना भेटी दिल्या.
त्या साडी नेसून चिखलमय भागात फिरताना दिसल्या. हे फोटो आणि व्हिडिओ सुरुवातीला जिल्हा प्रशासनाच्या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आले होते. आयएएस अधिकारी कीर्ती जल्ली लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या ऐकत असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. ते चिखलात चालत आहेत. लोक कीर्ती जल्लीचे फोटो शेअर करून 'असे असतात आयएएस अधिकारी' असे म्हणत त्यांचे कौतुक करत आहेत.
Tweet
This is @dccachar Jalli Keerthi visiting field after devastation from flood. Images winning heart as administration is not run here sitting in comforting chairs. DC visited low lying areas of Borkhola in Cachar, to build confidence among people.@himantabiswa @CMOfficeAssam pic.twitter.com/yWNTjEGBbD
— Kushal Deb Roy (@kushaldebroy) May 25, 2022
महिला आयएएस अधिकाऱ्यांना सखल भागात जायचे आहे
यादरम्यान, जल्ली म्हणाल्या की, त्यांना सखल भागात भेट देऊन खऱ्या समस्यांचे आकलन करायचे आहे ज्यामुळे जिल्हा प्रशासन आणि सरकारला भविष्यासाठी चांगला कृती आराखडा तयार करण्यास मदत होईल. “स्थानिक लोक म्हणाले की त्यांना गेल्या 50 वर्षांपासून समान समस्या भेडसावत आहेत आणि आम्हाला वाटले की आपण तिथे जाऊन वास्तविक समस्या पाहणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे पूर."
Tweet
The visuals of IAS officer Keerthi Jalli’s walk through the flood-affected areas of Assam’s Cachar district has gone viral on social media
Read here: https://t.co/NIfwU027Ju pic.twitter.com/sctDjMBpUW
— Hindustan Times (@htTweets) May 26, 2022
पहिल्यांदाच उपसरपंच पोहचले गावात
जिल्ह्यातील उपायुक्त आपल्या गावांना भेट देण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे स्थानिकांनी सांगितले. बराक नदीला आलेल्या पुरामुळे दरवर्षी होणारा त्रास त्यांनी सविस्तरपणे सांगितला. भविष्यात होणारे नुकसान कमी व्हावे यासाठी गावांच्या सुरक्षेवर भर देणार असल्याचे उपायुक्तांनी सांगितले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, कचार यांच्या मते, यावर्षी 291 गावांमध्ये 163,000 लोकांना पुराचा फटका बसला आहे. कचारमध्ये 11,200 घरांचे नुकसान झाले आहे, तर 5,915 हेक्टर पीक क्षेत्र पाण्याखाली गेले आहे.