MS Swaminathan (PC- Wikimedia Commons)

MS Swaminathan Passed Away: भारतातील हरित क्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन (MS Swaminathan) यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी चेन्नईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वामीनाथन हे भारतातील लोकप्रिय शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जात होते. स्वामीनाथन यांना भारतातील हरित क्रांतीचे जनक मानले जाते. गव्हाच्या उत्कृष्ट जातीला ओळखणारे आणि स्वीकारणारे ते पहिले शास्त्रज्ञ होते. त्यांच्या संशोधनामुळे भारतातील गव्हाच्या उत्पादनात मोठी वाढ झाली. स्वामिनाथन यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी आणि शेतीला चालना देण्यासाठी स्वामीनाथन यांनी शिफारशी केल्या होत्या, मात्र आजपर्यंत या शिफारशींची पूर्ण अंमलबजावणी झालेली नाही. आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी झाल्याचे सरकार सांगत असले तरी अद्याप त्याची पूर्ण अंमलबजावणी झालेली नाही. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याची मागणी शेतकरी आंदोलनातून वारंवार करत आहेत. (हेही वाचा -Congress Leader Detained: पंजाब काँग्रेस नेते सुखपाल सिंह खैरा एनडीपीएस कायद्यांतर्गत पोलिसांच्या ताब्यात)

स्वामिनाथन आयोगाची स्थापना 18 नोव्हेंबर 2004 रोजी झाली होती. वास्तविक, या आयोगाचे नाव राष्ट्रीय शेतकरी आयोग आहे आणि त्याचे अध्यक्ष एमएस स्वामीनाथन आहेत. त्यांच्या नावावरून या आयोगाला स्वामीनाथन आयोग असे नाव देण्यात आले. बराच काळ शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्यानंतर या आयोगाने केंद्राकडे कृषी क्षेत्रात अनेक महत्त्वाच्या सुधारणांची मागणी केली होती.

 

पीएम मोदींनी व्यक्त केला शोक -

स्वामीनाथन यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले, स्वामिनाथन जी यांच्या निधनाने दु:ख झाले. देशाच्या इतिहासातील या अत्यंत महत्त्वाच्या काळात कृषी क्षेत्रातील त्यांच्या अभूतपूर्व कार्यामुळे कोट्यवधी लोकांचे जीवन बदलले आणि देशात अन्नसुरक्षा सुनिश्चित झाली.