PM Modi Oath Ceremony: प्रख्यात वाळू कलाकार सुदर्शन पटनायक (Sudarshan Patnaik) यांनी पुरी, ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे अभिनंदन करण्यासाठी वाळूचे शिल्प तयार केले आहे. आज संध्याकाळी 7:15 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी होणार आहे. पुरी बीचवर तयार करण्यात आलेल्या वाळूच्या कलाकृतीमध्ये नरेंद्र मोदींची तपशीलवार प्रतिमा 'अभिनंदन मोदी जी 3.0' असं लिहिण्यात आलं आहे. या अभिनंदन संदेशासोबत पटनायक यांनी कलाकृतीच्या खाली 'विकसित भारत' असेही लिहिले आहे. पटनायक यांनीही X वर पोस्ट करून नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे मोदी दुसरे नेते -
पंतप्रधानपदासाठी नामनिर्देशित नरेंद्र मोदी यांच्या आज होणाऱ्या शपथविधी समारंभाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. भारताचे पंतप्रधान म्हणून पंतप्रधान मोदींच्या सलग तिसऱ्या कार्यकाळाची सुरुवात या समारंभाने होईल. PM मोदींच्या नेतृत्वाखाली NDA आघाडी पुन्हा एकदा केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी सज्ज झाली आहे. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनंतर, पंतप्रधान मोदी हे एकमेव नेते आहेत जे मागील प्रत्येक कार्यकाळ पूर्ण करून सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. (हेही वाचा - Narendra Modi Swearing-in Ceremony: नरेंद्र मोदींनी शपथविधीपूर्वी वाहिली महात्मा गांधी, वाजपेयी यांना आदरांजली)
पहा व्हिडिओ -
Modi 3.0 loading...
For the swearing-in ceremony of PM @narendramodi ji, sand artist Sudarshan Patnaik felicitated him by creating sand art. pic.twitter.com/oqbv4FDJLI
— Gyanendra Giri (Modi ka Parivar) (@iGyanendraGiri) June 9, 2024
दरम्यान, आज नरेंद्र मोदींसोबत त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यही शपथ घेणार आहेत. दिल्ली पोलिसांचे सुमारे 1,100 वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले आहेत. तथापी, शेजारील प्रदेश आणि हिंदी महासागर क्षेत्रातील अनेक नेते आणि राष्ट्रप्रमुखांना पंतप्रधान मोदींच्या शपथविधी समारंभासाठी विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. जे भारताच्या 'नेबरहुड फर्स्ट' धोरणाचा पुरावा आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू, सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफिफ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी शपथविधीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण स्वीकारले आहे.