Hippopotamus (Photo Credit - Pixabay)

Hippopotamus Attack On Employee Of Lucknow Zoo: लखनौच्या नवाब वाजिद अली शाह प्राणी उद्यानात (Lucknow Zoo) सोमवारी एक दुःखद घटना घडली. येथे कुंपण साफ करण्यासाठी गेलेल्या दोन कामगारांवर अचानक पाणघोड्याने हल्ला (Hippopotamus Attack) केला. गंभीर जखमी झालेल्या सफाई कर्मचाऱ्याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. यातील एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. पाणघोड्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती.

काही दिवसांपूर्वीच या पाणघोड्याला कानपूर प्राणीसंग्रहालयातून लखनऊ प्राणीसंग्रहालयात आणण्यात आले होते. स्वीपर सूरज लखनऊ प्राणीसंग्रहालयात सुमारे 12 वर्षांपासून काम करत होता. सूरजच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (हेही वाचा - Karnataka Shocker: रस्त्यात खेळताना 3 वर्षाच्या मुलीला कारने चिरडले, घटना कॅमेरात कैद)

पहा व्हिडिओ - 

प्राप्त माहितीनुसार, कॅम्पवेल रोड, बरोरा पोलीस स्टेशन, ठाकूरगंज, लखनौ येथे राहणारा सूरज हा त्याच्या कुटुंबातील एकमेव कमावता व्यक्ती होता. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी असा परिवार आहे.