Elephant Falls and Dies: तमिळनाडूमध्ये अन्नाच्या शोधत असलेल्या एका हत्तीणीचा पाय घसरून ती 70 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली. यात तिचा मृत्यू ( Dies) झाला. वन विभागाचे अधिकारी तेथे पोहोचले आहेत. वन अधिकारी घटनास्थळी पोहोचले तेव्हा हत्तीण जिवंत होती. परंतु बचाव कार्य सुरू करण्यापूर्वीच हत्तीण पाय घसरून पुन्हा एकदा पडली. यात तिचा मृत्यू झाला. ही घटना सकाळी निलगिरी (Nilgiri) येथे घडली. 33 वर्षीय मादी हत्तीणी डोंगराळ भागातून चालत असताना घसरली आणि एका मोठ्या दगडावर पडली. (Elephant Deaths In Madhya Pradesh's Bandhavgarh: मध्य प्रदेशातील बांधवगड राष्ट्रीय उद्यानात 48 तासांत 8 हत्तींचा मृत्यू; काय आहे कारण? SIT करणार तपास)
दुर्दैवाने, दुसऱ्यांदा कोसळणे हत्तीणीसाठी प्राणघातक ठरले. वन अधिकाऱ्यांनी हत्तीणीला मृत्यूपूर्वी तिला शेवटच्या क्षणी दिलासा देण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर पाण्याचा मारा केला. ज्यामुळे तिला काहीसे बरे वाटेल. मात्र, तसे झाले नाही. प्राथमिक शवविच्छेदन अहवालात असे दिसून आले आहे की पडल्यामुळे तिच्या हाडांना दुखापत झाली. त्यामुळे हत्तीणीचा मृत्यू झाला. वन अधिकाऱ्यांनी मृतदेह जंगलात पुरला आहे.
हत्तीण 70 फूट खोल दरीत पडली; दुर्दैवाने मृत्यू
An elephant tragically fell 70 feet to its death near Coonoor, Tamil Nadu, while migrating in search of food and water. The changing climate conditions have led several elephant herds to migrate through forest ranges between Kerala and Tamil Nadu, facing dangerous terrains.… pic.twitter.com/eQCh9In6y5
— India Today NE (@IndiaTodayNE) January 12, 2025
हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढीमुळे नीलगिरी भागातील हत्तींच्या निवासस्थानावर परिणाम झाला आहे. ज्यामुळे त्यांना अन्न आणि पाण्याच्या शोधात त्यांना मोठी पायपीट करावी लागत आहे. अवघड आणि धोकादायक मार्गांनी जावे लागत आहे. स्थलांतर करताना, हत्तींना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते, कधीकधी ते भटकतात आणि दुर्गम प्रदेशात जातात. ज्यामुळे त्यांचा मृत्यू होतो.