मध्य प्रदेश, राजस्थान सह 5 राज्यांमध्ये निवडणुका जाहीर, 11डिसेंबरला  मतमोजणी
ओपी रावत (Photo Credit-ANI Twitter)

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ आणि मिझोराम,छत्तीसगड या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या राज्यांमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. मध्यप्रदेश आणि मिझोराममध्ये 28 नोव्हेंबर रोजी तर राजस्थान आणि तेलंगणामध्ये 7 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर छत्तीसगाडीमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे.

छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान 12 नोव्हेंबर तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 20 नोव्हेंबरला होणार आहे. साऱ्या निवडणुकांचा निकाल 11 डिसेंबर रोजी जाहीर केला जाईल. या निवडणुकीदरम्यान आधुनिक वीवीपॅट-एवीएम मशीनचा वापर करण्यात येणार आहे.

 

छत्तीसगडमध्ये 90, मध्यप्रदेशमध्ये 230, मिझोराममध्ये 40, तेलंगणामध्ये 119 तर राजस्थानमध्ये 200 विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे. निवडणूक आयुक्तांची पत्रकार परिषद 12.30  मिनिटांनी आयोजित केली होती. मात्र काही कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आयुक्त रावत यांनी दिली.