Western Railway Recruitment 2021: रेल्वेमध्ये 10 वी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी 3,591 Apprentice जागांसाठी भरती; परीक्षा न घेता करण्यात येणार उमेदवारांची निवड
Indian Railways (Photo Credits: I File Image)

Western Railway Recruitment 2021: वेस्टर्न रेल्वे (WR), रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC) ने अप्रेंटिस पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी करुन अर्ज मागविले आहेत. या भरतीअंतर्गत इलेक्ट्रीशियन, कारपेंटर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, पेंटर, पाईप फिटर, प्लंबर, ड्राफ्ट्समन, पासा, वेल्डर, डिझेल मेकॅनिक यासह विविध पदांवर एकूण 3591 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 25 मे 2021 पासून सुरू केली जाईल. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट www.rrc-wr.com वर भेट देऊन अर्ज करण्यास सक्षम असतील. संकेतस्थळावरील ऑनलाईन अर्ज लिंक 25 मे रोजी सकाळी 11 वाजेपासून उपलब्ध असेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जून 2021 (संध्याकाळी 5 वाजेपर्यंत) आहे. (वाचा - BMC Recruitment 2021: मुंबई महापालिकेत प्रयोगशाळेतील तंत्रज्ञ आणि फार्मासिस्ट या पदांसाठी भरती; उमेदवार portal.mcgm.gov.in वर करू शकतात अर्ज)

रिक्त जागांचा तपशील -

 • मुंबई विभाग (एमएमसीटी): 738 पोस्ट.
 • वडोदरा (बीआरसी) विभाग: 489 पोस्ट.
 • अहमदाबाद विभाग (एडीआय): 611पोस्ट.
 • रतलाम विभाग (आरटीएम): 434 पोस्ट.
 • राजकोट विभाग (आरजेटी) : 176 पोस्ट
 • भावनगर विभाग (बीवीपी) : 210 पोस्ट
 • लोअर परेल (पीएल) डब्ल्यू/शॉप : 396 पोस्ट
 • महालक्ष्मी (एमएक्स) डब्ल्यू/शॉप : 64 पोस्ट
 • भावनगर (बीवीपी) डब्ल्यू / शॉप : 73 पोस्ट
 • दाहोद (डीएचडी) डब्ल्यू/शॉप : 187 पोस्ट
 • प्रताप नगर (पीआरटीएन) डब्ल्यू/शॉप, वडोदरा : 45 पोस्ट
 • साबरमती (एसबीआय) इंजीनियरिंग डब्ल्यू/शॉप, अहमदाबाद : 60 पोस्ट
 • साबरमती (एसबीआय) सिग्नल डब्ल्यू/शॉप, अहमदाबाद : 25 पोस्ट
 • हेडक्वार्टर ऑफिस - 83 पोस्ट

पात्रतेचे निकष जाणून घ्या -

मान्यताप्राप्त मंडळाकडून किमान 50 टक्के गुणांसह दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. याव्यतिरिक्त, संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्याच वेळी उमेदवारांचे वय 15 वर्षांपेक्षा कमी नसावे आणि 24 वर्षांपेक्षा जास्त नसावे. वयाची गणना 24 जून 2021 नुसार केली जाईल. आरक्षित उमेदवारांसाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा शिथिल असेल. पात्रतेच्या निकषांबद्दल अधिक माहितीसाठी आपण अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.

अशी होईल निवड -

दहावी व आयटीआयमध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करून उमेदवारांची निवड केली जाईल. निवड प्रक्रियेच्या तपशीलांसाठी आपण अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.