Online | Pixabay.com

नॅशनल टेस्टिंग एजंसी कडून University Grants Commission (UGC) National Eligibility Test (NET)  च्या सुधारित वेळापत्रकाची अ‍ॅडमीट कार्ड्स जारी करण्यात आली आहे. ही हॉलतिकीटं ugcnet.nta.ac.in वर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. पूर्वी 15 जानेवारीला होणारी ही परीक्षा देशभर साजरा केल्या जाणार्‍या पोंगल, मकरसंक्रांती या सणांमुळे पुढे ढकलण्यात आली. एनटीए ने जारी वेळापत्रकामध्ये आता ही परीक्षा 21 आणि 27 जानेवारी अशा दोन दिवशी होणार असल्याची माहिती दिली आहे.

UGC NET च्या परीक्षेला सामोरे जाणार्‍या विद्यार्थ्यांना आता त्यांचा अ‍ॅप्लिकेशन नंबर आणि जन्म तारीख यांच्या आधारे अधिकृत वेबसाईट वरून हॉल तिकीट डाऊनलोड करता येणार आहे.

कसं डाऊनलोड कराल UGC NET admit card

  • अधिकृत वेबसाईट ugcnet.nta.ac.in वर भेट द्या.
  • आता अ‍ॅडमीट कार्ड डाऊनलोड लिं क वर क्लिक करा.
  • तुमचा अ‍ॅप्लिकेशन नंबर आणि जन्म तारीख टाका.
  • आता तुमचं अ‍ॅडमीट कार्ड डाऊनलोड करा.

सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती आणि पीएच.डी.साठी प्रवेश , सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती, या पदांसाठी ही परीक्षा घेतली जाते.

कोणत्याही उमेदवाराला त्यांच्या प्रवेशपत्रांमध्ये दिलेल्या तारखेला आणि वेळेशिवाय परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाणार नाही. परीक्षेला जाताना त्यांच्याकडे अ‍ॅडमीट कार्ड असणं आवश्यक आहे.