IBPS SO Recruitment 2020: बँकेत 645 Specialist Officer पदाच्या भरतीसाठी सोमवारी अर्ज करण्याची अंतिम तारीख; असा करा अर्ज
प्रतिकात्मक फोटो (File Photo)

IBPS SO Recruitment 2020: जर आपण एखाद्या बँकेत नोकरी शोधत असाल, तर आपल्यासाठी एक उत्तम संधी आहे. इंडियन इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनेल (Indian Institute of Banking Personnel, IBPS) ने स्पेशलिस्ट ऑफिसर (Specialist Officer) पदाची भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 645 पदे नेमली जाणार आहेत. उमेदवार आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइट ibps.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन लॉगिन करावे लागेल. यासाठी अर्ज करण्यासाठी 23 नोव्हेंबर 2020 ही अंतिम तारीख आहे.

आयबीपीएस कडून या पदावर भरतीसाठी उमेदवारांना राष्ट्रीय पातळीवर प्रीलिम्स व मेन्स परीक्षा पास करावी लागेल. आयबीपीएस कॅलेंडरनुसार, प्रीलिम्स परीक्षा 26 आणि 27 डिसेंबर 2020 रोजी घेण्यात येईल. पूर्वपरीक्षेच्या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना एसओ मेन्स परीक्षेस हजर राहावे लागेल. ही परीक्षा 30 जानेवारी 2020 रोजी घेण्यात येईल. (हेही वाचा -IOCL Recruitment 2020: इंडियन ऑइलमध्ये 400 हून अधिक जागांसाठी नोकर भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रियेसंबंधित अधिक माहिती)

या तारखांवर ठेवा लक्ष -

  • आयबीपीएस एसओ 2020: अधिसूचना जारी करण्याची तारीख - 01 नोव्हेंबर 2020
  • आयबीपीएस एसओ नोंदणी प्रारंभ तारीख - 2 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2020
  • अर्ज फी भरणे - 02 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2020
  • आयबीपीएस एसओ प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची तारीख - डिसेंबर 2020
  • आयबीपीएस एसओ निकालाची तारीख - जानेवारी 2021
  • आयबीपीएस एसओ मेन्स प्रवेश पत्र - जानेवारी 2021 डाउनलोड
  • आयबीपीएस एसओ मुख्य परीक्षेची तारीख- 24 जानेवारी 2021
  • 2020-21 - फेब्रुवारी 2021 मध्ये ऑनलाइन मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर
  • आयबीपीएस एसओ मुलाखत प्रवेश कार्डची तारीख 2020-21
  • आयबीपीएस एसओ प्रोविजिनल अलॉटमेंट 2020-2021 - एप्रिल 2021

IBPS SO 2020 Recruitment - जागा

आईटी ऑफिसर स्केल 1- 20 पोस्ट, एग्रीकल्चरल फील्ड ऑफिसर- 485 पोस्ट, मार्केटिंग ऑफिसर- 60 पोस्टलॉ ऑफिसर- 50 पोस्ट,एचआर पर्सनल ऑफिसर स्केल- 7 पदांवर नेमणूक केली जाईल.