MHT CET 2020 Exam: सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली महाराष्ट्रातील सीईटी परीक्षा पुढे ढकलण्याची याचिका
Supreme Court | (File Image)

सर्वोच्च न्यायालयाने आज (24 ऑगस्ट) MHT CET 2020 परीक्षा पुढे ढकलण्याच्या याचिकेला फेटाळले आहे. दरम्यान न्यायाधीश अशोक भूषण, सुभाष रेड्डी यांच्या खंडपीठाने हा निर्णय सुनावला आहे. दरम्यान ही याचिका फेटाळताना यंदा JEE Main 2020 आणि NEET 2020 च्या परीक्षा आधीच जाहीर केल्या आहेत. अशावेळी एका राज्यासाठी आम्ही प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याच्या सूचना कशा देऊ शकतो? असा सवाल करत याचिका फेटाळली आहे.

दरम्यान महाराष्ट्रामध्ये Maharashtra CET 2020 परीक्षा उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री उदय सामंत यांनी यापूर्वीच पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. अद्याप सीईटी 2020 ची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

MHT CET exam ही परीक्षा प्रत्येक वर्षी विविध विषयांच्या undergraduate आणि postgraduate professional courses साठी घेतल्या जातात. दरम्यान इतर राज्यांमध्ये कोरोना संकटकाळातच सीईटी परीक्षा घेतल्या आहेत.

यंदाच्या जेईई मेन्स आणि नीट परीक्षा सप्टेंबर महिन्यात घेतली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने यंदा गल्फ कंट्री म्हणजेच आखाती देशामध्ये नीट परीक्षेच्या Undergraduate (UG) 2020 ची परीक्षा केंद्रं देण्यासही नकार दिला आहे. दरम्यान विद्यार्थ्यांनी वंदे भारत मिशन अंतर्गत भारतामध्ये येऊन परीक्षा द्याव्यात असं आवाहन केले आहे.

कोरोना संकटाचं सावट पाहता युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याचा विचार करावा अशी मागणी केली आहे.