Railway Recruitment 2022: भारतीय रेल्वे विभागात 'या' पदांसाठी भरती; 'असा' करा अर्ज, वाचा सविस्तर
Representational Image (Photo Credits: PTI)

Railway Recruitment 2022:  उत्तर मध्य रेल्वेने ज्युनियर टेक्निकल असोसिएट पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवार 18 एप्रिल 2022 पर्यंत अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइनद्वारे या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 8 एप्रिलपासून सुरू झाली आहे.

जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या भरती प्रक्रियेद्वारे कनिष्ठ तांत्रिक सहयोगी (सिव्हिल) च्या 20 पदांची भरती केली जाईल. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी 8 पदे, इतर मागासवर्गीयांसाठी 5 पदे, अनुसूचित जातीसाठी 3 पदे, एसटी प्रवर्गासाठी 2 पदे आणि आर्थिक दुर्बल घटकासाठी 2 पदे निश्चित करण्यात आली आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून किमान 60% गुणांसह सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे. (हेही वाचा - JEE Main Exam 2022 Update: विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर जेईई मेन परीक्षेच्या तारखा बदलल्या; जाणून घ्या नवीन वेळापत्रक)

याशिवाय ज्युनियर टेक्निकल असोसिएट भरतीसाठी उमेदवाराचे वय 18 ते 33 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. सरकारी नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत विशेष सवलत दिली जाईल. स्वारस्य असलेले उमेदवार भरतीशी संबंधित इतर माहितीसाठी जारी केलेली अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

असा करा अर्ज -

या भरतीतील पदांसाठी उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. इच्छुक उमेदवार 18 एप्रिल 2022 पर्यंत अधिकृत वेबसाइट rrcpryg.org वर भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करू शकतील. यासाठी उमेदवारांना अर्ज फी म्हणून 100 रुपये भरावे लागतील.