NLC Recruitment 2020: एनएलसी मध्ये पदवीधर आणि टेक्नीशियन अप्रेंटिसच्या 500 हून अधिक पदांसाठी नोकर भरती, जाणून घ्या डिटेल्स
प्रतिकात्मक फोटो (File Photo)

NLC Recruitment 2020: जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण एनएलसी इंडिया लिमिटेड यांनी ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि टेक्नीशियन अप्रेंटिस पदासाठी नोकर भरती करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत एकूण 550 पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून डिग्री मिळवलेली असावी. तर टेक्निशियन डिप्लोमासाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेतून संबंधित फिल्डमध्ये डिप्लोमा केलेला असावा.(SSC Released 2020 Exam Dates: स्टाफ सिलेक्शन कमिशन कडून CGL, CHSL, JE, MTS परीक्षांच्या तारखा जाहीर; ssc.nic.in वर पहा वेळपत्रक)

नोकर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी लक्षात ठेवावे की, एनएलसी अपरेंटिस ऑनलाईन अर्ज 15 ऑक्टोंबर पासून सुरु होणार आहे. तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 नोव्हेंबर 2020 देण्यात आली आहे. एनएटीएस पोर्टल येथे रजिस्ट्रेशनची अंतिम तारीख 3 नोव्हेंबर 2020 आहे. अखेरच्या वेळेस गडबड होऊ नये म्हणून उमेदवारांनी योग्य वेळीच अर्ज करावे असे आवाहन करण्यात आले आहे.(Online Employment Fair: कोरोना विषाणूच्या काळात महाराष्ट्र सरकारकडून नोकरीच्या संधी; 3,401 पदांसाठी भरती सुरु, जाणून घ्या कुठे कराल अर्ज)

>>टेक्नीशियन अप्रेंटिस- 300 पद

>>इलेक्ट्रिकल अॅन्ड इलेक्ट्रानिक्स इंजीनियरिंग- 85

>>इलेक्ट्रिकल अॅन्ड कम्युनिकेशन इंजीनियरिंग- 10

>>सिविल इंजीनियरिंग- 35

>>मॅकेनिकल इंजीनियरिंग- 90

>>फॉर्मासिस्ट- 15

NLC Recruitment 2020 साठी वेतन किती असणार?

>>ग्रेजुएट अप्रेंटिस- 15208

>>टेक्निकल डिप्लोमा अप्रेटिंस- 12524

उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी https://www.nlcindia.com/ ला भेट द्यावी. तेथे नोकरी संबंधित जाहीर करण्यात आलेल्या सुचना वाचाव्या लागणार आहेत. उमेदवाराला नोटिफिकेशनमध्ये पदांची संख्या, वयाची अट, निवडण प्रक्रियासह संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. त्यानंतरच उमेदवारांनी योग्य पदानुसाार अर्ज करावा. तसेच उमेदवारांची निवड ही शैक्षणिक वर्षातील गुणांच्या आधारवरुन केली जाणार आहे.