NIRF Ranking 2019: राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) आज नॅशनल इंस्टीट्युट रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) याची घोषणा करणार आहेत. त्याचसोबत रँकिंग ऑफ इंस्टीट्युशन ऑन इनोवेशन अचिव्हमेंट्स (ARIIA 2019) ह्याची सुद्धा घोषणा करणार आहेत.
रँकिंगच्या कॅटेगरीमध्ये टॉप 9 महाविद्यालयांच्या नावाची यादी जाहीर करण्यात येणार आहेत. त्यामध्ये युनिर्व्हसिटी, इंजिनिअर, कॉलेज, मॅनेजमेंट, फार्मसी, मेडिकल, लॉ कॉलेज आणि सर्व पद्धतींचे शिक्षण देणारे महाविद्यालय अशा पद्धतीची कॅटेगरी असणार आहे. 2016 पासून देशात कॉलेज आणि युनिर्व्हसिटीची रँकिंग विविध कोर्सच्या आधारवर केली जाते.
NIRF Rankings 2019 to be released today, check details here pic.twitter.com/F8ckgJ0YKP
— narendra singh solan (@narendra271984s) April 8, 2019
तर गेल्या वर्षी सर्वश्रेष्ठ इंजिनिअर कॉलेज म्हणून इंडियन इंन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास यांना घोषित केले होते. तसेच इंडियन इंस्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद या कॉलेजला सर्वश्रेष्ठ मॅनेजमेंट म्हणून घोषित करण्यात आले होते.