![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2024/06/Examinations_AC.jpg?width=380&height=214)
नॅशनल टेस्टिंग एजंसी कडून National Eligibility cum Entrance Test Undergraduate (NEET UG) 2025 ची तारीख आज ( 7 फेब्रुवारी) जाहीर केली आहे. NEET UG 2025 परीक्षा यंदा 4 मे दिवशी होणार आहे. ही परीक्षा दुपारी 2 ते 5 यावेळेत होणार आहे. ही परीक्षा पेन अॅन्ड पेपर फॉर्मेट मध्ये होणार आहे. नीट युजी 2025 ची अॅप्लिकेशन विंडो आता ओपन झाली आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन neet.nta.nic.in वर करता येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 मार्च आहे. तर correction window ही 9 मार्च ते 11 मार्च दरम्यान उघडणार आहे. यामध्ये महत्त्वाचे एडिट्स करता येणार आहे.
भारतातील पदवीपूर्व वैद्यकीय आणि संबंधित अभ्यासक्रमांसाठी एकमेव प्रवेश परीक्षा म्हणून, NEET UG इच्छुक डॉक्टरांसाठी एक महत्त्वपूर्ण परीक्षा आहे. अधिकृत अधिसूचनेनुसार, NEET UG 2025 चे निकाल 14 जून 2025 पर्यंत घोषित केले जातील.
NEET UG 2025 च्या पेपरमध्ये आता 180 अनिवार्य प्रश्न असतील - प्रत्येकी 45 भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र आणि 90 जीवशास्त्रातील प्रश्न आहेत.
NEET-UG परीक्षा तारीख जाहीर
STORY | NEET-UG to be conducted on May 4
READ: https://t.co/ig3DTHJmuN pic.twitter.com/BqBbNkZDjp
— Press Trust of India (@PTI_News) February 7, 2025
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने NEET UG 2025 साठी सेक्शन B मधील पर्यायी प्रश्न काढून टाकले आहेत, परीक्षा पुन्हा त्याच्या प्री-COVID फॉरमॅटमध्ये आणली आहे. NEET UG 2025 देणार्या उमेदवारांना यापुढे अतिरिक्त वेळ किंवा पर्यायी प्रश्न नसतील, जे महामारी दरम्यान तात्पुरते उपाय म्हणून सादर केले गेले होते.